Jacqueline Fernandez नव्या पुरुषासोबत स्पॉट, प्रसिद्ध गायक म्हणाला, ‘हा सुकेशपेक्षा चांगला…’

| Updated on: Oct 01, 2023 | 12:27 PM

Jacqueline Fernandez | सुकेश चंद्रशेखर याच्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या जॅकलीन फर्नांडिस हिचे 'या' पुरुषासोबत फोटो व्हायरल, फोटोंवर अनेक सेलिब्रिटींची प्रतिक्रिया... सध्या सर्वत्र अभिनेत्रीचे फोटो व्हायरल होत आहेत. पण गायकाने केलेल्या कमेंटने वेधलं अनेकांचं लक्ष...

Jacqueline Fernandez नव्या पुरुषासोबत स्पॉट, प्रसिद्ध गायक म्हणाला, हा सुकेशपेक्षा चांगला...
Follow us on

मुंबई : 1 ऑक्टोबर 2023 | अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. जॅकलीन हिचे नाव आरोपी सुकेश चंद्रशेखर यांच्यासोबत मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकल्यापासून अभिनेत्री वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ज्यामुळे अभिनेत्रीला कोर्टाच्या पायऱ्या देखील चढाव्या लागल्या. एवढंच नाही तर, आजही सुकेश तुरुंगातून जॅकलीन हिला प्रेम पत्र लिहित असतो. एवढंच नाही तर, सोशल मीडियावर दोघांचे खासगी फोटो देखील पोस्ट झाले होते. ज्यामुळे अभनेत्रीचं खासगी आयुष्य चव्हाट्यावर आलं होतं. पण आता जॅकलीन सुकेश याच्यामुळे नाही तर, अन्य एका पुरुषामुळे चर्चेत आली आहे. जॅकलिन हिने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. सध्या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

जॅकलिन फर्नांडिस हिने अॅक्शन लिजेंड आणि हॉलिवूड अभिनेता जीन-क्लॉड व्हॅन डॅमे याच्यासोबत एक फोटो शेअर केला आहे. दोघांचे फोटो इटली येथील आहे. फोटोवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. तर दुसरीकडे जॅकलिन फर्नांडिस आणि व्हॅन डॅमे एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसतील अशी शक्यता चाहत्यांकडून वर्तवण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

 

अभिनेत्रीच्या फोटोवर अभिनेता वरुण धवन, निल नितिन मुकेश आणि सोनू सूद यांनी देखील कमेंत केली आहे. तर प्रसिद्ध गायक मिका सिंग याच्या कमेंटने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अभिनेत्रीच्या फोटोवर मिका सिंग म्हणाला, ‘तू सुंदर दिसत आहेस… हा सुकेश याच्यापेक्षा चांगला आहे…’ सध्या सर्वत्र गायकाने केलेल्या कमेंटची चर्चा रंगली आहे….

महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिका सिंग याने ट्विट केल्यानंतर तात्काळ डिलिट केला. पण फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सांगायचं झालं तर, सुकेश चंद्रशेखर २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात तिहार तुरुंगात बंद आहे. ज्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्रीची देखील अनेकदा चौकशी करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी दोन फोटो व्हायरल झाले होते ज्यात जॅकलीन आणि सुकेश एकमेकांना किस करताना दिसले होते. आता हॉलिवूडच्या अभिनेत्यासोबत फोटो व्हायरल होत असल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जॅकलीन फर्नांडिस आणि तिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.