‘बिग बॉस मराठी’ सीझन 5 हे प्रचंड गाजलं. त्यात सुरुवातीला भांडण, वाद यामुळे सगळ्यांच्या नजरेत आलेले सदस्य म्हणजे निक्की आणि जान्हवी किल्लेकर. त्यात जास्तीतजास्त जास्त जान्हवीला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. जानवी तिच्या स्वभावामुळे विशेष चर्चेत राहिली. दिग्गज कलाकारांचा केलेल्या अपमानामुळे जान्हवीला मात्र कलाकारांपासून ते प्रेक्षकांपर्यंत तसेच रितेश देशमुख यांनीही तिच्या या वागण्याबद्दल राग व्यक्त केला. पण यानंतर तिने स्वतःमध्ये बदल करून सर्वांचे मन जिंकण्याचा नक्कीच प्रयत्न केला आणि शेवटी घराबाहेर येताना ती टास्क क्वीन म्हणून बाहेर पडली.
मात्र आता बाहेर आल्यानंतरही जान्हवी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे तिच्या बिग बॉस मधील कपड्यांवरून. ‘बिग बॉस’मध्ये घातलेल्या कपड्यांचा जान्हवी लिलाव करणार असल्याची चर्चा फारच रंगली आहे.
‘बिग बॉस’ मध्ये घातलेल्या कपड्यांचा जान्हवी लिलाव करणार?
‘बिग बॉस’ मधून बाहेर आल्यानंतर जान्हवी शो मध्ये घातलेल्या कपड्यांचा लिलाव करणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र नुकतेच जान्हवीने व्हिडीओ शेअर करत यावर मौन सोडलं आहे.
तिने म्हटलं की, “व्हिडीओ बनवण्यामागचं कारण असं आहे की, आताच मी एक अफवा वाचली. अनेकजण मला फोन करुनही याबाबत विचारत आहेत. सुरुवातीला मला यावर विश्वास बसत नव्हता पण आता मी स्वतःहून मी ते वाचलं. जान्हवी ‘बिग बॉस’च्या घरात घातलेल्या कपड्यांचा लिलाव करणार आहे.”
पुढे ती म्हणाली “जान्हवीने ‘बिग बॉस’ च्या घरात घेतलेले १०० ड्रेस व ४० नाईट ड्रेसचे ती लिलाव करणार आहे. या सगळ्या गोष्टींचा काय संबंध आहे. मी १०० ड्रेस घेतले आहेत ते मी वापरेन त्याचा मी लिलाव का करेन?”. असा प्रश्न तिने व्हिडिओद्वारे उपस्थित केला आहे.
उगीच अफवा पसरवू नका
जान्हवीने व्हिडीओ शेअर करत असंही म्हटलं की , “कृपया मी सगळ्यांना विनंती करेन की अशा अफवा उगीच पसरवू नका. मला कोणतेही माझे कपडे विकायचे नाही आणि ते मुळात विकण्यासारखे नाही आहेत. ते माझे कपडे आहेत त्यामुळे माझे कपडे मी का विकू?. ते कपडे खूप महागडे नाही आहेत. त्यामुळे विनंती आहे की, उगीच काहीही अफवा पसरवू नका”. अशी तिने विनंती केली आहे.
व्हिडीओ शेअर करत अफवांना पूर्णविराम
जान्हवीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेल्या तिच्या व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. व्हिडीओमध्ये तिने प्रेक्षकांना विनंती केली असून तिचा व्हिडिओ खूपच चर्चेचा विषय ठरत आहे. तसेच या व्हिडिओच्या माध्यमातून तिने या अफवांना पूर्णविराम दिला आहे.
सूरजची बारामतीला जाऊन भेट घेतली
दरम्यान जान्हवीने नुकतीच ‘बिग बॉस’ विजेता सूरज चव्हाणची त्याच्या गावी बारामतीला जाऊन भेट घेतली. सोशल मीडियावर त्यांच्या भेटीचे फोटो प्रचंड व्हायरल झाले. तसेच चाहत्यांनी या बहिण-भावाच्या जोडीच्या फोटोंवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव केलेला पाहायला मिळाला.