आजवर पौराणिक, ऐतिहासिक, थरारक अशा विविध विषयांच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. त्यातच आता सोनी मराठी वाहिनीने नव्या मालिकेची घोषणा केली आहे. ‘जय जय शनिदेव’ असं या मालिकेचं नाव आहे. जीवनात सुख, शांतता आणि समाधान देणारी न्यायाची देवता ‘शनिदेव’ यांच्यावर आधारित ही नवी मालिका असणार आहे. अभिनेता संकेत खेडकर या मालिकेत शनिदेवांची भूमिका साकारणार आहे. याआधी त्याने विविध मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. पण प्रमुख भूमिका म्हणून ‘शनिदेव’ ही संकेतची पहिलीच मालिका आहे.
विशेष म्हणजे संकेत हा मूळचा अहमदनगरचा आहे. शनिदेवाचं शणिशिंगणापूर हे देवस्थान अहमदनगरमध्येच आहे. त्यामुळे मालिकेत शनिदेवांची भूमिका साकारणं हे त्याचं भाग्यच म्हणावं लागेल. नुकतीच ‘जय जय शनिदेव’ या मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली. शनिदेवांची भूमिका कोण साकारणार आणि त्यांची वेशभूषा कशी असेल याची चर्चा तेव्हापासूनच रंगली होती. पण आता शनिदेवांची वेशभूषा प्रेक्षकांसमोर आली आहे. त्यावर मिळणारा प्रतिसाद आणि प्रेक्षकांचं प्रेम पाहून शनिदेव हा विषय प्रेक्षकांच्या किती जवळचा आहे, हे कळतंय.
शनिदेव ही न्यायाची देवता आपल्या भक्तांच्या जीवनात सुख, शांतता आणि समाधान मिळवून देण्यासाठी मदत करते. शनिदेवाची ही कथा अजून कोणीही प्रेक्षकांसमोर आणलेला नाही. येत्या 8 मेपासून ही कथा सोनी मराठी वाहिनीवर उलगडणार आहे. जीवनात सुख, शांतता आणि समाधान देणारी न्यायाची देवता ‘शनिदेव’ यांचा जीवनप्रवास या मालिकेतून उलगडणार आहे. संकेत खेडकर हा अभिनेता शनिदेवाची भूमिका कशा प्रकारे साकारतो, ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ‘जय जय शनिदेव’ ही मालिका येत्या 8 मेपासून रात्री 9.30 वाजता सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.