‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत पहायला मिळणार स्वामींचं महालक्ष्मी रूप

| Updated on: Dec 03, 2024 | 2:03 PM

स्वामी समर्थांच्या जीवनातील दिव्य कथा, त्यांच्या अलौकिक चमत्कारिक कार्यांचा प्रवास आणि त्यांच्या उपदेशांनी भरलेले अनेक प्रसंग यामुळे ही मालिका महाराष्ट्रातील घराघरात लोकप्रिय झाली आहे.

जय जय  स्वामी समर्थ मालिकेत पहायला मिळणार स्वामींचं महालक्ष्मी रूप
Jai Jai Swami Samarth
Image Credit source: Instagram
Follow us on

कलर्स मराठी वाहिनीवरील ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. मालिकेत हा आठवडा खास असणार आहे. कारण या आठवड्यात मालिकेतील स्वामी समर्थांच्या विलक्षण लीलांचं दर्शन प्रेक्षकांना घडणार आहे. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या पूजेसाठी प्रार्थना करणाऱ्या विधवा गिरीजाला स्वामी तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन महालक्ष्मी रूपात दर्शन देतील. स्वामींच्या या दिव्य लीलांमधून प्रेक्षकांना शिकवण आणि मार्गदर्शन मिळणार आहे.

याच भागात स्वामींनी दत्तजयंतीसाठी केलेले संकेत देखील प्रेक्षकांना रोमांचित करतील. महाराज येणार असल्याचं जाहीर करत स्वामी आपले आसन रिकामे करून खऱ्या मानकऱ्याचं स्वागत करण्याची तयारी सुरू करायला सांगतात. हे आगळे दैवी संकेत येत्या दत्तजयंतीच्या निमित्ताने एका नवीन अध्यायाची सुरुवात करतील.

हे सुद्धा वाचा

स्वामी सुताच्या गादीचा उत्तराधिकारी कोण?

स्वामींनी गादीच्या उत्तराधिकारासाठी नियोजित केलेली अगम्य रचना आणि कपिलामाईला दिलेला इशारा हा कथानकाचा आणखी एक महत्त्वाचा भाग असेल. स्वामी सुतांच्या गादीचा वारस निश्चित करण्याची दैवी लीला पूर्णत्वास जाऊ लागेल. एका गरीब भक्ताचं मंगळसूत्र लुटणाऱ्या कपिलामाईला स्वामी सुताच्या गादीच्या संदर्भात अप्रत्यक्ष संदेश देत दैवी हस्तक्षेपाचे दर्शन घडवतील.

मालिकेच्या आगामी भागांत दाखवले जाणारे प्रसंग, विशेषतः स्वामींच्या महालक्ष्मी रूपाचं दर्शन आणि दत्तजयंतीच्या आगमनाची तयारी हे प्रेक्षकांसाठी एक अद्वितीय अनुभव ठरतील. ‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये स्वामींच्या या चमत्कारिक कथा दैवी साक्षात्कारांसह प्रेक्षकांना अध्यात्माचा सखोल अर्थ शिकवतील. ‘जय जय स्वामी समर्थ’ ही मालिका दररोज रात्री 8 वाजता कलर्स मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

या मालिकेला संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात रसिक प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतोय. अन्यायाला मोडीत काढत आणि मार्गातल्या असंख्य लोकांचा उद्धार करत, त्यांना उपदेश करत स्वामी समर्थ कसे सोलापूर इथल्या अक्कलकोटला पोहोचले, कशी लोकांना त्यांच्या महानतेची प्रचिती येत गेली, अक्कलकोट इथल्या चोळप्पा महाराज, सेवेकरी सुंदराबाई, अक्कलकोटचे राजे मालोजीराव, या भक्तांनी स्वामीलीला अनुभवली आणि ते कसे कृतार्थ झाले, त्यांचं कसं नातं होतं आणि या भक्तिमार्गात आणखी कोणकोणती माणसं श्री स्वामी समर्थांच्या कृपाछायेखाली आली हे सगळं प्रेक्षकांना या मालिकेमध्ये आजवर बघायला मिळालं. या मालिकेने काही दिवसांपूर्वीच 1300 भागांचा महत्त्वपूर्ण टप्पा पार करून प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलंय.