Urfi Javed: मॉडेल उर्फे जावेद कायम तिच्या कपड्यांमुळे चर्चेत असते. उर्फी कायम तिच्या लूकवर नवनवीन प्रयोग करत असते. उर्फीचा फॅशन सेन्स अनेकांना आवडतो, अनेक जण उर्फीला ट्रोल करत असताात. आता देखील एका व्यक्तीच्या कमेंटवर उर्फीने संताप व्यक्त केला आहे. सांगायचं झालं तर, उर्फीच्या एका व्हिडीओवर दिवंगत अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिचा एक्स – बॉयफ्रेंड राहुल राज याने कमेंट केली. राहुलच्या कमेंटवर संताप व्यक्त करत उर्फीने त्याला प्रत्युषाची आठवण करून दिली.
उर्फीने नुकताच ड्रॅगन लूकमध्ये एक पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला. अभिनेत्री ड्रेसमधील काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले. तर राहुल राज याने उर्फीच्या पोस्ट कमेंट करत तिची खिल्ली उडवली. राहुल म्हणाला, ‘कार्टुन आहे ही मुलगी… हिच्यासाठी सर्कस उत्तम जागा आहे…’ सध्या सर्वत्र राहुल याने केलेल्या कमेंटची चर्चा रंगली आहे.
राहुलच्या कमेंटवर उत्तर देत उर्फी म्हणाली, ‘तुझ्यासाठी तुरुंग उत्तम जागा आहे. आम्ही अद्याप प्रत्युषाला विसरलो नाही..’ यावर राहुल म्हणाला, ‘तू तर मनावर घेतलंय, मी तर कौतुक करत होतो… लोकं सर्कससाठी तिकिट विकत घेतात.’ सध्या सर्वत्र उर्फा जावेद आणि राहुल राज याची चर्चा रंगली आहे.
प्रत्युषा बॅनर्जी हिने स्वतःचं आयुष्य संपवल्यानंतर राहुल याच्यावर अभिनेत्रीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचे आरोप लावण्यात आले होते. अभिनेत्रीच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली होती. शिवाय मृत्यूपूर्वी प्रत्युषा हिने व्हाट्ऍप स्टेटसवर ‘मरके भी माही तुझसे मुँह न मोड ना, बोल ना माही बोलना…’ ही अभिनेत्री आलिया भट्ट हिच्या गाण्यातील एक ओळ लिहिली होती. एवढंच नाही तर डिप्रेशनमध्ये असल्यामुळे अभिनेत्रीने मोठा निर्णय घेतला असं देखील अनेकदा सांगण्यात आलं.