मुंबई | 13 ऑगस्ट 2023 : वयाच्या ७२ व्या वर्षी देखील सुपरस्टार रजनीकांत यांचा जलवा कमी झालेला नाही. त्यांना मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. नुकताच रजनीकांत स्टारर ‘जेलर’ प्रदर्शित झाला आहे. सिनेमा बॉक्स ऑफिसवर देखील मोठी कमाई करताना दिसत आहे. सिनेमात रजनीकांत महत्त्वाच्या भूमिकेत असल्यामुळे त्यांना पाहण्यासाठी चाहते सिनेमागृहात गर्दी करताना दिसत आहेत. पण सिनेमात भूमिका साकारण्यासाठी रजनीकांत यांनी कोट्यवधी रुपयांचं मानधन घेतलं आहे. रिपोर्टनुसार रजनीकांत यांनी एका सिनेमासाठी तब्बल ११० कोटी रुपयांचं मानधन घेतलं आहे. तर दुसरीकडे सिनेमातील इतर कलाकारांनी देखील कोट्यवधी रुपयांचं मानधन घेतलं आहे.
काही दिवसांपूर्वी रजनीकांत निवृत्ती घेतील अशी चर्चा देखील रंगली होती. काही राहीलेले प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर रजनीकांत काही वर्षांत अभिनय क्षेत्रातून निवृत्ती घेतील अशी चर्चा देखील रंगत आहे. रिपोर्टनुसार, रजनीकांत स्टारर ‘जेलर’ सिनेमाचं बजेट २२५ कोटी रुपये आहे. यातील मोठा वाटा सेलिब्रिटी त्यांच्या घरी घेवून गेले आहेत.
रजनीकांत यांनी सिनेमाच्या बजेटचा ४८ टक्के म्हणजे तब्बल ११० कोटी रुपयांवर स्वतःचा मालकी हक्क दाखलेला आहे. रजनीकांत यांनी दोन वर्षांनंतर ‘जेलर’ सिनेमाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं आहे. दिग्दर्शक नेल्सन द्वारे दिग्दर्शित सिनेमा १० ऑगस्ट रोजी तमिळ, तेलुगु आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. तर ‘जेलर’ सिनेमात भूमिका साकारण्यासाठी इतर सेलिब्रिटींनी देखील कोटी रुपये मानधन घेतलं आहे.
‘जेलर’ सिनेमासाठी रजनीकांत यांनी सर्वात जास्त मानधन घेतलं आहे. तर मोहनलाल यांनी तब्बल ८ कोटी रुपयांचं मानधन घेतलं आहे. एवढंच नाही, सिनेमा पाहुण्या कलाकाराची भूमिका बजावणाऱ्या शिव राजकुमार याने ४ कोटी रुपये मानधन घेतलं आहे.
जॅकी श्रॉफ यांनी देखील सिनेमात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ज्यासाठी त्यांनी ४ कोटी रुपये मानधन घेतलं आहे. सिनेमात जॅकी श्रॉफ यांची खलनायकाची भूमिका आहे. तर सिनेमात अभिनेत्र तमन्ना भाटिया हिने देखील महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. ज्यासाठी अभिनेत्रीने ४ कोटी रुपयांचं मानधन घेतलं आहे.. तर सुनील, राम्या कृष्णन आणि योगी बाबू यांनी प्रत्येकी १ कोटी रुपयांचं मानधन घेतलं आहे. सध्या सर्वत्र सिनेमाच्या कमाईची देखील चर्चा रंगत आहे.