Janhvi Kapoor | ‘आईने मला जवळ घेतलं, कुरवाळत होती पण…’, श्रीदेवी यांचे शेवटचे शब्द ठरले जान्हवीची आठवण

| Updated on: Jul 08, 2023 | 10:08 AM

श्रीदेवी यांना निधनाची चाहूल लागली होती? त्या लेकीच्या खोलीत आल्या आणि..., अनेक वर्षांनंतर जान्हवी कपूर हिने सांगितली आईची शेवटची आठवण...

Janhvi Kapoor | आईने मला जवळ घेतलं, कुरवाळत होती पण..., श्रीदेवी यांचे शेवटचे शब्द ठरले जान्हवीची आठवण
Follow us on

मुंबई | दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि त्यांच्या दोन मुली जान्हवी आणि खूशी निर्माते बोनी कपूर यांचं दुसरं कुटुंब आहे. बोनी कपूर यांच्या पहिल्या पत्नीचं नाव मोना शौरी कपूर होतं. त्यांना दोन मुलं आहेत. अभिनेता अर्जुन कपूर आणि अंशुला कपूर… बोनी कपूर यांनी दुसरं लग्न केल्यामुळे अर्जुन कपूर याने श्रीदेवी आणि त्यांच्या दोन मुलींचा स्वीकार केला नव्हाता. पण जेव्हा श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी कळाली तेव्हा अर्जुन कपूर सावत्र बहिणी जान्हवी आणि खुशी यांच्यासोबत मोठा भाऊ म्हणून उभा राहिला. २०१८ साली दुबईत श्रीदेवी यांनी अखेरचा श्वास घेतला. पण आयुष्यात आईची जागा कोणीच भरुन काढत नाही.. हे देखील सत्य आहे. नुकताच झालेल्या मुलाखतीत जान्हवीने आईच्या शेवटच्या शब्दांबद्दल आणि कुटुंबाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

जान्हवी हिने सांगितलं की, जेव्हा श्रेदेवी दुबईला जायला निघाल्या होत्या, तेव्हा आईसोबत शेवटचा संवाद झाला होता. तेव्हा जान्हवी तिचा पहिला सिनेमा ‘धडक’चं शुटिंग करत होती. शुटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे जान्हवीला आईसोबत वेळ व्यतीत करण्यासाठी वेळ नव्हता.

आई दुबईला जाणार असल्यामुळे एक दिवस आधी जान्हवी श्रीदेवी यांच्या खोलीत गेली होती. पण आई पॅकिंग करण्यात व्यस्त असल्याचं पाहून जान्हवी पुन्हा तिच्या खोलीत आली. पण श्रीदेवी मात्र सर्व काम आवरुन झाल्यानंतर लेकीला पाहण्यासाठी जान्हवीच्या खोलीत आल्या होत्या.

आईसोबत घालवलेल्या शेवटच्या क्षणांबद्दल सांगताना जान्हवी म्हणाली, ‘आई दुबईला जाणार होती म्हणून व्यस्त होती. मी शुटिंगमुळे थकली होती. तेव्हा आईला सांगितलं मला झोप नाही लागत मला झोपव… आई माझ्या खोलीत आली तेव्हा मी झोपेत होती.. पण मला कळत होतं काही आई आहे आणि मला कुरवाळत आहे..’

‘त्या दिवशी ती सर्व काम संपवून माझ्याकडे आली. तिने मला तेव्हा जवळ घेतलं आणि डोक्यावर हात फिरवू लागवी होती…’ श्रीदेवी यांच्यासोबत घालवलेले हे क्षण जाह्नवीच्या आयुष्यातील शेवटचे क्षण ठरले. (janhvi kapoor sridevi news)

पुढे जान्हवी म्हणाली, ‘आईच्या निधनानंतर सर्व कुटुंब एकत्र आलं. पण तोपर्यंत माझ्या आईला कायम एकटेपणा सतावत राहिला. पण कठीण काळात कुटुंब एकत्र आल्यामुळे आधार मिळाला. आईला गमावलं होतं आणि याची भरपाई कोणतंही नातं करु शकत नाही… ‘ असं देखील जान्हवी म्हणाली.