Janhvi Kapoor with Ex-boyfriend : झगमगत्या विश्वात कायम चर्चा रंगत असते ती म्हणजे सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याबद्दल. सध्या अभिनेत्री जान्हवी कपूरच्या आयुष्यातील खास व्यक्तीबद्दल चर्चा रंगत आहे. नुकताच जान्हवीला एक्स-बॉयफ्रेंड शिखर पहाडियासोबत स्पॉट करण्यात आलं. म्हणून जान्हवी आजही शिखरला डेट करतेय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. रिपोर्टनुसार गेल्या काही महिन्यांपासून जान्हवी आणि शिखर यांनी पुन्हा बोलायला सुरूवात केली आहे. सध्या जान्हवी आणि शिखरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या साखरपुड्याच्या पार्टीमध्ये जान्हवी आणि शिखरला एकत्र स्पॉट करण्यात आलं. तेव्हा शिखर जान्हवीसाठी थांबला होता आणि त्यानंतर जान्हवी आल्यानंतर दोघांनी एकत्र पार्टीमध्ये एन्ट्री केली. शिखर हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे.
जवळपास ६ वर्षांपूर्वी त्यांच्या नात्याची गोष्ट समोर आली होती. जेव्हा सोशल मीडियावर दोघांचा एक फोटो तुफान व्हायरल झाला होता. फोटो व्हायरल झाल्यानंतर दिवंगत अभिनेत्री आणि जान्हवीच्या आई श्रीदेवी प्रचंड नाराज झाल्या होत्या. त्यानंतर शिखर आणि जान्हवी यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला.
दरम्यान, शिखरसोबत असलेल्या नात्याचा खुलासा जान्हवीने दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये केला होता. जेव्हा सारा आणि जान्हवी ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये पोहोचल्या होत्या तेव्हा करणने दोघींबद्दल एक मोठं सत्य उघड केलं.
करण म्हणाला, ‘तुम्ही दोघींनी दोन सख्या भावांना डेट केलं आहे.’ तेव्हा देखील जान्हवी आणि शिखरच्या रिलेशनशिपबद्दल अनेक चर्चा रंगल्या. जान्हवी आणि सारा दोन संख्या भावांना डेट करत होत्या. दोघांचं नाव वीर पहारिया आणि शिखर पहारिया आहे. वीर आणि शिखर हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचे नातू आहेत.