बॉलिवूडमध्ये असो किंवा टीव्ही इंडस्ट्रीमध्ये सुंदर दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरी करणे काही नवीन नाही. पण ती यशस्वी झाली तर ठिक अन्यथा त्यामुळे चेहरा खराब होण्याची शक्यताही नाकारता येत नाही, अनेक अभिनेत्रींनी त्याचा अनुभव घेतलाही आहे. बरं, आत प्लास्टिक सर्जरीला पर्याय म्हणून
बोटॉक्स अन् फिलर आले आहे. अनेक अभिनेत्री हे देखील करतात. ओठांना आकार देण्य़ासाठी जास्त करून हे केलं जातं. पण काहीवेळेला यामुळे अभिनेत्रींचे ओठ हे सुजल्यासारखे भासतात. असेच काहीसे पाहायाला मिळाले आहे टीव्ही इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध चेहरा म्हणजे अभिनेत्री जॅस्मिन भसीनबाबत.
जॅस्मिन सुजलेला चेहरा अन् ओठ पाहून नेटकरी संतापले
जॅस्मिनचे सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. जॅस्मिनने छोट्या पडद्यासोबत पंजाबी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून काम केले आहे. जॅस्मिन सोशल मीडियावर चाहत्यांसोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या एका व्हिडीओमुळे मात्र नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ज्यावरुन
व्हिडीओमध्ये जॅस्मिनला ओळखणे कठीण
Jasmin Bhasin’s botox and fillers are being discussed.
जॅस्मिन एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तिला ओळखणं अनेक चाहत्यांना काहीसं कठीण जात आहे. या व्हिडीओमध्ये जॅस्मिन पूर्णपणे वेगळी दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तिच्या चेहऱ्यामध्ये काही बदल झाल्याचे जाणवतं आहे. या लूकवरून तरी तिने बोटॉक्स आणि फिलर केल्याची चर्चा सुरु आहे. चांगलं दिसण्यासाठी अनेक अभिनेत्री प्लास्टिक सर्जरी करतात, तर काही जण बोटॉक्स आणि फिलरचा पर्याय निवडतात. जॅस्मिन भसीनचा बदललेला अवतार पाहून तिनेही बोटॉक्स आणि फिलरस केल्याची चर्चा सोशल मीडियावर चर्चा सुरु झाल्या आहेत.
Jasmin Bhasin’s botox and fillers are being discussed.
जस्मिन भसीनचे चाहते नाराज
जस्मिन भसीनचे चाहते तिच्या सौंदर्यावर नेहमीच कमेंट करत असतात. असं असताना आताचा तिचा बदललेला चेहरा पाहून मात्र तिचे चाहते नाराज झाले आहेत. जेव्हा जस्मिनने इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तिचा चेहरा आणि ओठही सुजल्यासारखा वाटत आहे.
चाहत्यांनी मात्र तिच्या या लूकवर नाराजी व्यक्त करत याला नापसंती दर्शवली आहे, एका युजरने म्हटलं आहे,” हा काय अवतार करून घेतला”, तर एकाने म्हटलं आहे,”आधी किती छान दिसत होती आता काय कमेंट करणार”. अशा पद्धतीने जस्मिनच्या या नव्या लूकवर चाहत्यांचा नाराजीचा सूर दिसून येत आहे.