मनिषा कोईराला हिच्यासोबत बलात्काराचा सीन म्हणजे…, अभिनेता असं का म्हणाला?

| Updated on: May 07, 2024 | 1:01 PM

Manisha Koirala | 'हीरामंडी' वेब सीरिजमध्ये मनिषा कोईराला हिच्यासोबत बलात्काराचा सीन, अभिनेत्या 'त्या' सीनवर अखेर सोडलं मौन..., अनेक वर्षांनंतर अभिनय विश्वात मनिषा हिचं पुन्हा पदार्पण, पण सीरिजमधील बलात्काराच्या सीनमुळे अभिनेत्री चर्चेत...

मनिषा कोईराला हिच्यासोबत बलात्काराचा सीन म्हणजे..., अभिनेता असं का म्हणाला?
Follow us on

अभिनेत्री मनिषा कोईराला हिने दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी’ सिनेमात मल्लिकाजान ही भूमिका साकारली आहे. जी संपूर्ण हीरामंडीवर राज्य करते. हीरामंडीमध्ये मल्लिकाजान हिच्या परवानगी शिवाय काहीही होत नाही… अशा मल्लिकाजानवर बलात्कार का? असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. सांगायचं झालं तर, सीरिजमध्ये ब्रिटीश अधिकारी कार्टराईट याने मल्लिकाजानचा बलात्कार केला. अभिनेत्याचं नाव जेसन शाह असं आहे.

नुकताच झालेल्या मुलाखतीत, जेसन शाह याने सीनवर मोठं वक्तव्य केलं आहे. अभिनेता म्हणाला, ‘मल्लिकाजान मुलगी आलमझेब हिला तुरुंगातून सोडण्यासाठी ब्रिटीश अधिकाऱ्याकडे विनंती करत होती. तेव्हा मल्लिकाजानवर बलात्कार होतो. सीरिजमध्ये सीन महत्त्वाचा होता. कारण ब्रिटीश सरकारची ताकत काय आहे हे मल्लिकाजान हिला दाखवून द्यायचं होतं…’

पुढे अभिनेता म्हणाला, ‘भारतात असं अनेकदा दाखवलं जातं, ही फार दुर्दैवी गोष्ट आहे. सीन करून मला कोणाला प्रोत्साहन द्यायचं नाही. हा फार मोठा मुद्दा आहे आणि आपण गांभीर्याने घ्यायला हवाय…कार्टराइटने जे काही केल तो एक अपराध आहे. असं कोणीही करायाल नाही हवं..’

हे सुद्धा वाचा

एवढंच नाही तर, अभिनेत्याने स्वतःबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे. जेसन शाह याचा जन्म एका गुजराती कुटुंबात झाला आहे. अभिनेत्याची आई ब्रिटीश होती. जेसन शाह याने कुटुंबात जातिवादचा समाना केला आहे. शिवाय स्किन टोन आईसारखा असल्यामुळे देखील जेसन शाह याला ट्रोल केलं जायचं.

संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी’ सीरिजला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. पण मनिषा कोईराला हिने साकारलेल्या भूमिकेची सर्वत्र चर्चा रंगली आहे. मनिषा कोईराला आता मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर मनिषा हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असते.