ऑलिम्पिकची ती पोस्ट मी केली नव्हती..; जावेद अख्तर यांची ‘X’ कडे तक्रार

| Updated on: Jul 29, 2024 | 3:57 PM

ज्येष्ठ गीतकार यांचं एक्स अकाऊंट हॅक झालं असून त्यावरून पॅरिस ऑलिम्पिक 2024 शी संबंधित एक ट्विट करण्यात आलं होतं. आता अख्तर यांनी नव्याने ट्विट करत याबद्दलची माहिती दिली की, ऑलिम्पिकबद्दलचं ट्विट त्यांनी केलं नव्हतं. याविषयी त्यांनी एक्सकडे तक्रार केली आहे.

ऑलिम्पिकची ती पोस्ट मी केली नव्हती..; जावेद अख्तर यांची X कडे तक्रार
Javed Akhtar
Image Credit source: Instagram
Follow us on

ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर हे त्यांच्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. सोशल मीडियावर ते बऱ्यापैकी सक्रिय असतात आणि विविध मुद्द्यांवर आपली मतं मोकळेपणे मांडतात. एक्स (ट्विटर) अकाऊंटवर ते चालू घडामोडी किंवा सामाजिक, राजकीय विषयांबद्दल ट्विट करत असतात. नुकतंच त्यांच्या एक्स अकाऊंटवरून पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंना शुभेच्छा देणारं एक पोस्ट लिहिण्यात आलं होतं. मात्र हे ट्विट मी केलं नाही, असं अख्तर यांनी स्पष्ट केलंय. त्याचप्रमाणे माझं एक्स अकाऊंट हॅक करून त्यावरून हे ट्विट करण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलंय.

जावेद अख्तर यांनी नवीन पोस्ट लिहित म्हटलंय, ‘माझं एक्स अकाऊंट हॅक झालं होतं. माझ्या अकाऊंटद्वारे भारतीय ऑलिम्पिक टीमसाठी एक ट्विट पोस्ट करण्यात आलं होतं. जरी त्या ट्विटमुळे कोणाचं काही नुकसान झालं नसलं तरी ते माझ्याकडून केलेलं नाही. आम्ही एक्समधील संबंधिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधून याबाबतीत तक्रार दाखल करण्याचा विचार करत आहोत.’ जावेद यांचं अकाऊंट पाहिल्यास सध्या ते ट्विट काढून टाकण्यात आलं आहे.

हे सुद्धा वाचा

जावेद अख्तर यांचं ट्विट-

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने रविवारी पहिला विजय पटकावला. ऑलिम्पिक नेमबाजीतील भारताची 12 वर्षांपासूनची प्रतीक्षा संपविताना मनू भाकरने पॅरिसमध्ये 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू भारताची पहिली महिला नेमबाज आहे. 22 वर्षीय मनूने 221.7 गुणांचा वेध घेत कांस्यपदक मिळवलं.