‘विवाहित आहे, परक्या पुरुषासोबत…’, ‘जवान’ फेम अभिनेत्रीच्या वक्तव्यामुळे सर्वत्र खळबळ

| Updated on: Jul 01, 2023 | 4:22 PM

विवाहानंतर 'जवान' फेम अभिनेत्रीचा मोठा निर्णय... खासगी आयुष्याबद्दल अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य, म्हणाली, 'विवाहित आहे, परक्या पुरुषासोबत...', सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा...

विवाहित आहे, परक्या पुरुषासोबत..., जवान फेम अभिनेत्रीच्या वक्तव्यामुळे सर्वत्र खळबळ
Follow us on

मुंबई | बॉलिवूडमध्ये अभिनेत्री कायम त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल मोठं वक्तव्य करत, त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक खुलासे करत असतात. आता देखील ‘जवान’ सिनेमातील मुख्य अभिनेत्रीने तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. ‘जवान’ सिनेमाच्यामध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणारी अभिनेत्री ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन हिची चुलत बहीण देखील आहे. शिवाय अभिनेत्रीने ‘द फॅमेली मॅन’ वेब सीरिजच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनात राज्य केलं. एवढंच नाही तर अभिनेत्री ‘सर्वम शक्‍तिमय’मध्ये देखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणीनसून अभिनेत्री प्र‍ियामणी आहे. प्र‍ियामणी हिचा दाक्षिणात्य सिनेविश्वात देखील बोलबाला आहे.

दाक्षिणात्य सिनेविश्वात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवल्यानंतर अभिनेत्रीने बॉलिवूडच्या दिशेने आपला मोर्चा वळवळा आहे. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं असलं तरी, अभिनेत्रीने ‘नो किसिंग पॉलिसी’ कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यावर अभिनेत्रीने मोठं वक्तव्य देखील केलं आहे. प्र‍ियामणी सध्या तिच्या ‘नो किसिंग पॉलिसीमुळे’ चर्चेत आहे.

प्र‍ियामणी हिच्या सौंदर्याची आणि अभिनयाची चर्चा सध्या सर्वत्र रंगत आहे. पण अभिनेत्री ऑनस्क्रिन इंटिमेट सीनपासून कायम दुर राहते. अभिनेत्रीने तिच्या करारात ‘नो किसिंग’ कलम जोडलं आहे. अभिनेत्रीच्या ‘नो किसिंग पॉलिसी’ मागे देखील मोठं रहस्य आहे. ‘जवान’ फेम अभिनेत्रीने नुकताच ‘नो किसिंग पॉलिसीवर’ मोठं वक्तव्य केलं आहे.

हे सुद्धा वाचा

अभिनेत्री प्र‍ियामणी म्हणाली, ‘ऑनस्क्रिन किस कधीही करणार नाही. किसिंग सीनसाठी माझ्याकडून कायम नकार असेल. मला चांगल्या प्रकारे माहिती आहे, की हे माझं काम आहे… फक्त एक भूमिका आहे. पण ऑनस्क्रिन कोणा दुसऱ्या व्यक्तीला किस करायचं असेल तर माझ्यासाठी ती गोष्ट सोपी नाही. मी विवाहित असल्यामुळे पतीला मला उत्तरं द्यावी लागतील…’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर माझी दोन्ही कुटुंब माझं काम पाहतील. त्यांना माहिती आहे, हे माझं काम आहे. पण लग्नानंतर इंटिमेट सीन करणं मला योग्य वाटत नाही. विवाहित असताना आमची सून हे असं का करत आहे? अशा अनेक चर्चा रंगतील.. मला माझे कुटुंबिय काहीही बोलणार नाहीत. पण ‘नो किसिंग पॉलिसी’ ही माझी स्वतःची निवड आहे…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

प्रियमणी हिने 23 ऑगस्ट 2017 रोजी मुस्तफा राजसोबत लग्न केलं… दोघांचं लग्न हा एक खाजगी सोहळा होता. साऊथशिवाय प्रियामणीने बॉलिवूडमध्येही काम केले आहे. ती ‘रावण’, ‘रक्तचरित्र 2’, ‘चेन्नई एक्सप्रेस’, ‘आतेत’ आणि ‘सलाम वेंकी’मध्ये दिसली असून आता प्रियमणी लवकरच अभिनेता शाहरुख खानच्या ‘जवान’ आणि अजय देवगण याच्या ‘मैदान’मध्ये दिसणार आहे