Jawan | कोणी मास्टर्स तर कोणी फक्त ग्रॅज्युएट; ‘जवान’मधल्या कलाकारांचं किती शिक्षण?

| Updated on: Sep 08, 2023 | 8:42 AM

'जवान' या चित्रपटातील स्टारकास्टविषयी प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता आहे. यामध्ये शाहरुखसोबतच नयनतारा, विजय सेतुपती, दीपिका पादुकोण, सान्या मल्होत्रा, प्रियामणी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. या कलाकारांचं शिक्षण किती झालं, ते पाहुयात..

Jawan | कोणी मास्टर्स तर कोणी फक्त ग्रॅज्युएट; जवानमधल्या कलाकारांचं किती शिक्षण?
Jawan Starcast
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई | 8 सप्टेंबर 2023 : अभिनेता शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून नेटकऱ्यांनी त्या चित्रपटाविषयी आणि त्यातील कलाकारांविषयी विविध गोष्टी गुगलवर सर्च करण्यास सुरुवात केली. कोणी या चित्रपटाच्या बजेटबद्दल सर्च करत होतं, तर कोणी या चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल जाणून घेण्यास उत्सुक होतं. ‘जवान’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेल्या कलाकारांचं किती शिक्षण पूर्ण झालं त्याबद्दल जाणून घेऊयात…

शाहरुख खान

‘जवान’मध्ये शाहरुख खान मुख्य भूमिकेत आहे. शाहरुखचं सुरुवातीचं शिक्षण दिल्लीच्या सेंट कोलंबस शाळेतून पूर्ण झालं. त्यानंतर त्याने हंसराज कॉलेजमधून अर्थशास्त्राची पदवी संपादित केली. शाहरुखने मास कम्युनिकेशन या विषयातील मास्टरची डिग्री जामिया मिलिया इस्लामियामधून घेतली.

हे सुद्धा वाचा

नयनतारा

दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा शाहरुखसोबत ‘जवान’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. नयनताराने इंग्लिश लिटरेचरमधून बॅचलर डिग्री संपादित केली आहे.

विजय सेतुपती

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आणखी एक प्रसिद्ध चेहरा म्हणजे विजय सेतुपती. ‘जवान’मध्ये त्याची खलनायकी भूमिका आहे. विजय फक्त अभिनेताच नव्हे तर तो गीतकार, निर्माता आणि लेखकसुद्धा आहे. विजयचं उच्च शिक्षण सेकंडरी स्कूल कोडंबाक्कममधल्या एमजीआर मधून झाली. कॉमर्समधून त्याने पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. त्याने दुबईत अकाऊंटंट म्हणून नोकरीसुद्धा केली होती.

प्रियामणी

दक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नाव कमावलेली आणि त्याचसोबत ‘फॅमिली मॅन’ या वेब सीरिजमधून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री प्रियामणी हिने 2003 मध्ये फिल्मी करिअरची सुरुवात केली. तिने श्री अरबिंदो मेमोरियल स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर ख्रिश्चियन लॉ कॉलेजमधून तिने बी. ए. सायकोलॉजीमध्ये पदवी संपादित केली.

रिधी डोग्रा

रिधी डोग्रा हे टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय नाव आहे. तिने डान्सर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. दिल्लीत जन्मलेल्या रिधीने तिचं शिक्षण दिल्लीतून पूर्ण केलं. एपीजे स्कूलमधून तिचं शालेय शिक्षण पूर्ण झालं. त्यानंतर कमला नेहरू कॉलेजमधून तिने बी. ए. सायकोलॉजीची पदवी संपादित केली.

सान्या मल्होत्रा

दंगल गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सान्या मल्होत्राचाही दिल्लीमध्ये जन्म झाला. तिने रेयान इंटरनॅशनल स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर गार्गी कॉलेजमधून तिने पदवीचे शिक्षण पूर्ण केलं.