असा काय नाईलाज होता… जय भानुशाली याला गुलाबी मॅक्सीत पाहून चाहते हैराण, व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Mar 29, 2024 | 11:55 AM

Jay Bhanushali | लोकप्रिय अभिनेता आणि होस्ट जय भानुशाली याला अशा अवस्थेत पाहून चाहते हैराण... अभिनेत्याला गुलाबी मॅक्सीतील नवा लूक चर्चेत..., सोशल मीडियावर सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जय भानुशाली याच्या व्हिडीओची चर्चा...

असा काय नाईलाज होता... जय भानुशाली याला गुलाबी मॅक्सीत पाहून चाहते हैराण, व्हिडीओ व्हायरल
Follow us on

अभिनेता जय भानुशाली फक्त एक उत्तम अभिनेता नाहीतर, प्रसिद्ध आणि लोकप्रिय होस्ट देखील आहे. जय फक्त त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाहीतर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. आता देखील अभिनेत्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अभिनेता गुलाबी रंगाच्या मॅक्सीमध्ये दिसत आहे. जय भानुशाली याने असा लूक का केला? असा प्रश्न चाहते अभिनेत्याला विचारत आहेत. तर अनेकांनी व्हायरल व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

28 मार्च, 2024 रोजी जय भानुशाली आणि माही विज यांची मुलगी तारा हिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला. ताराच्या आईने व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केल्याची चर्चा रंगली आहे. व्हिडीओमध्ये जय गुलाबी रंगाची मॅक्सी घालतो आणि खोलीतून बाहेर येताना दिसत आहे.

हे सुद्धा वाचा

 

खोलीतून बाहेर आल्यानंतर अभिनेता मुलांसोबत खेळताना दिसत आहे. वडिलांना अशा लूकमध्ये पाहून लेक तारा हिच्या चेहऱ्यावर देखील आनंद येतो. व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ‘असा काय नाईलाज होता…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘बाप मुलीसाठी काहीही करु शकतो…’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘फक्त मुलीच्या चेहऱ्यावर आनंद पाहण्यासाठी…’

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जय याची प्रतिक्रिया

अभिनेता म्हणाला, ‘लेक तारा हिची इच्छा होती म्हणून मी असं केलं… तू असं का केलंस? प्रचंड लाजिरवाणं आहे…’, सोशल मीडियावर अभिनेत्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. अनेकांना जय याचा हा अंदाज आवडला आहे, तर काहींनी अभिनेत्याला ट्रोल केलं आहे.

जय भानुशआली – माही विज

जय भानुशआली – माही विज यांनी लग्नाच्या 4 वर्षांनंतर खुशी – राजवीर यांना दत्तक घेतलं. त्यानंतर 3 ऑगस्ट 2019 मध्ये माही हिने गोंडस मुलीला जन्म दिला. जय भानुशआली – माही विज यांनी लेकीचं नाव तारा असं ठेवलं आहे. दोघे मुलीचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.

जय भानुशआली – माही विज देखील सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर दोघांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी जय भानुशआली – माही विज दोघे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.