बऱ्याच वर्षांनंतर सासू-सून एकाच फ्रेममध्ये; जया बच्चन-ऐश्वर्या रायला एकत्र पाहून नेटकरी खुश!

| Updated on: Aug 31, 2023 | 9:21 AM

जया बच्चन आणि ऐश्वर्या राय ही सासू-सुनेची जोडी सहसा मीडियासमोर एकत्र येत नाही. म्हणूनच रक्षाबंधननिमित्त जेव्हा दोघी एकाच फ्रेममध्ये दिसल्या, तेव्हा सोशल मीडियावर त्याची चर्चा होणं साहजिकच आहे.

1 / 5
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मुंबईत आल्या आहेत. मुंबईत दाखल होताच त्यांनी बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन  यांच्या निवासस्थानी भेट दिली.

2 / 5
ममता बॅनर्जी यांनी रक्षाबंधननिमित्त अमिताभ बच्चन यांना राखी बांधली. बिग बींनी गेल्या वर्षीच्या कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाला हजेरी लावली होती. तिथे ममता बॅनर्जी यांनी त्यांना भारतरत्न देण्याची मागणी केली होती.

3 / 5
ममता बॅनर्जी यांनी अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर त्यांना कोलकात्याला यायचं निमंत्रण दिलं आहे. यावेळी बच्चन कुटुंबातील सासू-सून अर्थात जया बच्चन आणि ऐश्वर्या राय बऱ्याच वर्षांनंतर एकाच फ्रेममध्ये दिसल्या.

4 / 5
जया बच्चन आणि ऐश्वर्या राय अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमात किंवा मीडियासमोर एकत्र येणं टाळतात. त्यामुळे दोघांना एकाच फ्रेममध्ये पाहिल्यानंतर त्यावर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली.

5 / 5
अमिताभ बच्चन आमचे भारतरत्न आहेत. त्यांच्या कुटुंबानेही चित्रपटसृष्टीत मोठं योगदान दिलं आहे. आज मी अमिताभ यांना राखी बांधली, त्यामुळे आजचा दिवस मोठा आहे, असं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं.