मुंबई : अभिनेत्री जया बच्चन (Jaya bachchan) कायम त्यांच्या कठोर स्वभावामुळे ओळखल्या जातात. जया बच्चन यांना परवानगी घेतल्याशिवाय फोटो काढणं बिलकूल आवडत नाही. जया यांना न सांगता फोटो काढल्यामुळे त्या अनेकदा फोटोग्राफर्सवर संतापल्या. आता पुन्हा एका अज्ञात व्यक्तीने जया बच्चन यांचे न सांगता फोटो काढल्यामुळे अभिनेत्री प्रचंड भडकल्या. एवढंच नाही तर त्यांनी अशा लोकांना नोकरीवरुन काढून टाकलं पाहिजे… असं देखील म्हणाल्या. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र जया बच्चन यांच्या व्हिडीओची चर्चा आहे. (jaya bachchan angry)
जया बच्चन महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत एका कार्यक्रमात पोहोचल्या होत्या. तेव्हा विमानतळावर एका व्यक्तीने त्यांचे फोटो काढले. सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये जया बच्चन एका व्यक्तीला फोटो काढण्यासाठी नकार देताना दिसत आहेत.
व्हिडीओमध्ये दिसत आहे, त्यांचं स्वागत फुलांसोबत करण्यात येतं. तेव्हा एक व्यक्ती व्हिडीओ तयार करत असल्याचं जया बच्चन यांना दिसतं. तेव्हा जया बच्चन त्या व्यक्ती म्हणतात, ‘माझे फोटो काढू नका.’ अभिनेत्री फोटोग्राफरला दोन वेळा फोटो नको काढू म्हणून सांगतात. पण तरी दोखील फोटोग्रार फोटो काढत असल्यामुळे जया बच्चन पुढे म्हणतात, ‘तुम्हाला इंग्रजी कळत नाही का?’
व्हिडीओ काढत असलेल्या फोटोग्राफरला दुसरा व्यक्ती बाजूला करतो आणि म्हणतो, ‘नको फोटो काढूस म्हणून सांगितलं होतं ना…’ तर पुढे जया बच्चन म्हणतात ‘अशा लोकांना नोकरीवरुन काढून टाकलं पाहीजे…’ सध्या जया बच्चन यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी जया बच्चन यांना ट्रोल केलं आहे. व्हिडीओवर एक व्यक्ती कमेंट करत म्हणाला, ‘त्या नको म्हणून सांगतात तर, तुम्ही त्यांचे फोटो का काढता’, तर दुसरा युजर म्हणतो, ‘जया बच्चन कायम असं का करतात?’ सध्या जया बच्चन यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.