‘सर्व मर्यादा ओलांडल्या…’, जया बच्चन यांनी उपराष्ट्रपतींकडे बोट दाखवल्याने वाद

| Updated on: Feb 12, 2023 | 2:04 PM

असं काय घडलं होतं की ज्यामुळे अभिनेत्री आणि राज्यसभा खासदार जया बच्चन यांनी उपराष्ट्रपतींकडे दाखवलं बोट , व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त

सर्व मर्यादा ओलांडल्या..., जया बच्चन यांनी उपराष्ट्रपतींकडे बोट दाखवल्याने वाद
अभिनेत्री आणि राज्यसभा खासदार जया बच्चन
Follow us on

Jaya Bachchan Angry Video : ज्येष्ठ अभिनेत्री आणि राज्यसभा खासदार जया बच्चन (Jaya Bachchan) कायम त्यांच्या आक्रमक स्वभावामुळे चर्चेत असतात. अनेकदा जया बच्चन यांनी पापाराझींवर भडकताना पाहिलं आहे. आता जया बच्चन यांचा राज्यसभेच्या अधिवेशनादरम्यानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. जया बच्चन यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. जया यांचा व्हिडीओमध्ये आक्रमक स्वभाव पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. व्हिडीओमध्ये जया बच्चन रागात दिसत आहे. पण नक्की प्रकरण काय आहे? याबद्दल जाणून घेवू.

जया बच्चन यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये जया बच्चन सभागृहातील खुर्चीकडे बोट दाखवत रागात काहीतरी बोलताना दिसत आहेत. यावेळी तर जया बच्चन यांनी थेट उपराष्ट्रपती जगदीप धनखर (Jagdeep Dhankhar) यांच्यावर बोट दाखवत आक्रमक होताना दिसत आहेत. सध्या सर्वत्र व्हिडीओची चर्चा आहे.

हे सुद्धा वाचा

 

 

जया बच्चन रागावल्यानंतर उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखर स्वतःच्या खुर्चीवरून उठतात आणि सभागृहातील सर्वांना स्वतःच्या जागेवर बसण्यासाठी सांगत असताना तेव्हा जया बच्चन सभागृहातून रागात निघून जात असल्याचं दिसत आहे. समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांच्या वागणुकीवर लोक ट्विटरच्या माध्यमातून टीका करत आहेत.

एक युजरने व्हिडीओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे. युजर म्हणाला, ‘जया बच्चन यांनी पुन्हा आपला राग व्यक्त केला आणि संसदेतील शिष्टाचाराची सीमा ओलांडली आहे.’ अनेकांनी जया बच्चन यांच्यावर टीका केली आहे. सध्या सर्वत्र जया बच्चन यांच्या व्हिडीओमुळे वाद पेटताना दिसत आहे.

एक अन्य युजर ट्विट करत म्हणाला, ‘जया बच्चन कधी आनंदी असतात? कायम सार्वजनिक ठिकाणी भांडताना दिसतात. सिनेमांमध्ये जया बच्चन यांच्या चेहऱ्यावर कायम आनंद असल्याचं आम्ही पाहिलं. एवढा राग कशासाठी… ‘ अशी प्रतिक्रिया ट्विटरच्या माध्यमातून नेटकरी देत आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी देखील जया बच्चन यांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. का अज्ञात व्यक्तीने जया बच्चन यांचे न सांगता फोटो काढल्यामुळे अभिनेत्री प्रचंड भडकल्या. एवढंच नाही तर त्यांनी अशा लोकांना नोकरीवरुन काढून टाकलं पाहिजे… असं देखील म्हणाल्या. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.