बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचं कुटुंब कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं. पण अभिनेत्री आणि बच्चन कुटुंबाची सून असल्यामुळे ऐश्वर्या राय कायम चर्चेत असते. ऐश्वर्या गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे, पण आजही तिच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही. अभिनेत्रीच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. अशात एका मुलाखतीत अभिनेत्री जया बच्चन यांनी सून ऐश्वर्या हिच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं.
‘कॉफी विथ करण’ शोमध्ये जया बच्चन यांनी ऐश्वर्या हिच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. शोमध्ये जया बच्चन यांनी सून ऐश्वर्या हिचं कौतुक केलं होतं. ‘ऐश्वर्या कोणतीही गोष्ट शांतपणे ऐकते. तिचा असा स्वभाव मला प्रचंड आवडतो. कायम घरातील सदस्यांच्या मागे ऐश्वर्या असते. ती कधीच स्वतःच्या हक्कांबद्दल बोलताना दिसत नाही…’
‘ऐश्वर्या प्रचंड प्रेमळ आहे. मला ऐश्वर्या आवडते आणि मला ती कायम आवडेल… तिचा शांत स्वभाव मला प्रचंड आवडतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती आता कुटुंबात फिट झाली आहे. ऐश्वर्या कुटुंबातील प्रत्येक नातेवाईकांना आणि मित्रांना ओळखते…’ असं जया बच्चन म्हणाल्या होत्या.
सांगायचं झालं तर, जया बच्चन पहिल्यापासून प्रचंड सतर्क होत्या आणि त्यांना बच्चन कुटुंबाची सून देखील तशीच हवी होती. जुन्या मुलाखतीत जया बच्चन म्हणाल्या होत्या, ‘मला परंपरा जपणारी आणि संस्कारी सून हवी आहे. अभिषेक याच्यासाठी मला संस्कारी मुलगी हवी आहे…’ जया बच्चन कायम कुटुंबाबद्दल सांगत असतात.
सांगायचं झालं तर, 2007 मध्ये अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचं लग्न झालं. लग्नानंतर अभिनेत्रीने 2011 मध्ये लेक आराध्या हिला जन्म दिला. पण गेल्या काही दिवसांपासून बच्चन कुटुंबत वाद असल्याच्या चर्चा रंगत आहेत. सासू जया बच्चन यांच्यासोबत असलेल्या मतभेदांमुळे अभिषेक – ऐश्वर्या यांचं घटस्फोट होणार असल्याच्या चर्चांनी देखील जोर धरला होता. पण यावर कोणतीच अधिकृत माहिती समोर आली नाही.
ऐश्वर्या राय हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. वयाच्या 50 व्या वर्षी देखील तिचं सौंदर्य कमी झालं नाही. नुकताच पार पडलेल्या कान फिल्म फेस्टिवलमध्ये अभिनेत्री फॅशन गोल्स देताना दिसली. तेव्हा ऐश्वर्या हिच्यासोबत लेक आराध्या देखील होती. ऐश्वर्या – आराध्या यांचे अनेक फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. खुद्द ऐश्वर्या लेकीसोबत फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.