जया बच्चन यांनी केला ऐश्वर्या राय हिच्याबद्दल मोठा खुलासा, थेट म्हणाल्या, ती कधीच…

| Updated on: Aug 13, 2024 | 3:17 PM

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याबद्दल सध्या विविध चर्चा या सातत्याने रंगताना दिसत आहेत. हेच नाही तर ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा घटस्फोट होणार असल्याचे सांगितले जातंय. मात्र, यावर बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही भाष्य करताना दिसत नाहीये. आता जया बच्चन यांचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय.

जया बच्चन यांनी केला ऐश्वर्या राय हिच्याबद्दल मोठा खुलासा, थेट म्हणाल्या, ती कधीच...
jaya bachchan and amitabh bachchan
Follow us on

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याबद्दल सध्या विविध चर्चा सुरू आहेत. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यातील वाद टोकाला गेल्याचे सांगितले जातंय. हेच नाही तर लवकरच यांचा घटस्फोट होणार असल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगितले गेले आहे. काही दिवसांपूर्वीच अभिषेक बच्चन याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसला. त्या व्हिडीओमध्ये अभिषेक बच्चन हा आपल्या लग्नाबद्दल बोलताना दिसला. व्हायरल होणारा अभिषेक बच्चन याचा तो व्हिडीओ जुना असल्याचे सांगितले गेले. सतत अभिषेक आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाची चर्चा आहे परंतू, यावर भाष्य करणे सर्वचजण टाळत आहेत.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नामध्ये बच्चन कुटुंबिय एकत्र दाखल झाले. मात्र, यावेळी ऐश्वर्या राय आणि तिची मुलगी आराध्या बच्चन या दोघी वेगळ्या आल्या. यामुळेच चर्चांना अधिक उधाण आल्याचे बघायला मिळाले. खरोखरच बच्चन कुटुंबियांमध्ये काही वाद सुरू आहे का? असा प्रश्नही सातत्याने चाहते विचारत आहेत.

सध्या सोशल मीडियावर जया बच्चन यांचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये काही मोठे खुलासे करताना जया बच्चन या दिसत आहेत. जया बच्चन यांनी म्हटले की, मुलगी आणि सुनेमध्ये मोठा फरक असतो. तुम्हालाही माहिती आहे. म्हणजे एक मुलगी आपल्या आई वडिलांचा फार आदर करत नाही. 

मुलगी आई वडिलांना गृहीत धरते. पण तुम्ही तुमच्या सासरच्यांसोबत हे करू शकत नाहीत. मुळात म्हणजे जसजसा काळ जातो, तसतसे सून नवीन कुटुंबाशी जुळवून घेते. आज मला भादुडीपेक्षा बच्चन जास्त जवळचे वाटते. जया बच्चन यांनी स्पष्टपणे सांगितले की, त्या आपल्या मुलांसाठी खूप जास्त कडक आणि कठोर आहेत. 

त्यावेळी जया बच्चन यांना विचारण्यात आले की, तुम्ही ऐश्वर्या राय हिच्यासोबत देखील कठोरपणे वागतात का? यावर जया बच्चन म्हणाल्या की, नाही…कारण ती माझी मुलगी नाही तर सून आहे. मी तिच्यासोबत कठोर नाही वागू शकत. हा पण हे नक्की आहे की, ऐश्वर्याची आई तिच्यासोबत कठोर वागू शकते. थोडक्यात काय तर जया बच्चन यांनी ऐश्वर्या राय हिला कधी मुलगी नाही तर सुनच मानले आहे. तसा व्हायरल होणारा जया बच्चन यांचा हा व्हिडीओ जुनाच आहे.