Rakhi Sawant Adil Khan Controversy : बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत (Rakhi Sawant) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. काही दिवसांपू्र्वी राखीच्या आईचं दिर्घ आजाराने निधन झालं. तेव्हा देखील राखी तुफान चर्चेत आली. आता राखी तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी राखी सावंत हिने पती आदिल खान दुर्रानी (Adil Khan Durrani) याच्यावर मारहाण आणि फसवणुकीचे आरोप केले होते. राखीने आदिल विरोधात पोलिसांत तक्रार केल्यानंतर आदीलला पोलिसांनी अटक केली आहे. वैवाहिक आयुष्यात आलेल्या वादळानंतर राखीने मोठा खुलासा केला आहे. राखीच्या आईला लेकीचे आदिल याच्यासोबत असलेले संबंध मान्य नव्हते.
आई जया भेडा यांचा आदिल खान आणि राखी यांच्या नात्याला विरोध होता, याबद्दल राखी म्हणाली, ‘माझी आई प्रचंड रडली आणि म्हणाली हे काय केलं तू. का स्वतःचा धर्म बदलला. आदिलसोबत का लग्न केलं? आईच्या या प्रश्नांवर मी म्हणाली, आदिलवर मी प्रेम करते. आदिल रुग्णालयात आला होता आणि त्याने माझ्या आईचे आशीर्वाद घेतले होते.’
पुढे राखी म्हणाली, ‘आदिलसोबत लग्न केल्यानंतर आई म्हणाली, तू आयुष्यात अनेक संकटांचा सामना केला आहे. आता स्वतःचं आयुष्य जग. आदिलला आई म्हणाली माझ्या लेकीला त्रास देवू नको. तिला मारू नकोस. अखेर आदिलने मला मारहाण केली. त्यानंतर मी आईला भेटण्यासाठी रुग्णालयात गेली. रुग्णालयात गेल्यानंतर आईने विचारलं तुझ्या चेहऱ्यावर जखमा कसल्या? तेव्हा मी सर्व सत्य आईला सांगितलं. तेव्हा माझी आई प्रचंड रडली. माझे वडील असते, तर माझ्यासोबत असं कधीही झालं नसतं.’ असं देखील राखई म्हणाली.
मारहाण आणि फसवणूक आणि अश्लील व्हिडीओ बनवून विकल्याचे गंभीर आरोप देखील राखीने आदिल याच्यावर केले आहेत. त्यामुळे आदिल खान याच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. एवढंच नाही तर, राखीने अनेक पुरावे देखील पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत. याप्रकरणी राखी हिचे वकील म्हणाले, ‘आमच्याकडे सबळ पुरावे आहेत. ज्यामुळे आदिल याला जामिन मिळणार आहे. १.५ कोटी रुपयांची फसवणूक प्रचंड मोठा गुन्हा आहे…’ वकिलांच्या वक्तव्यानंतर याप्रकरणी काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (Rakhi Sawant lifestyle)
राखीच्या आई जया भेडा गेल्या दोन वर्षांपासून ब्रेन ट्यूमर आणि कर्करोगशी गंभीर आजारांशी झुंजत होत्या. पण त्यांची झुंज अपयशी ठरली. अनेकदा जया भेडा रोखीसोबत कार्यक्रमांमध्ये दिसल्या. दोघींचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. पण गेल्या दोन वर्षांपासून जया भेडा सोशल मीडियापासून दूर होत्या. पण आता त्यांच्या निधनामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.