मुंबई : नशीब कधी आणि कोणत्या ठिकाणी घेवून जाईल काहीही सांगता येत नाही. मेहनत करायची जिद्द असेल तर, नशीब नक्कीच साथ देतं. पण आयुष्यात काही अशा घटना घडतात, ज्यावर आपण विश्वास देखील ठेवू शकत नाही. झगमगत्या विश्वातील अनेक सेलिब्रिटींबद्दल असं काही घडलं आणि त्यांना एक वेगळी ओळख मिळाली. अभिनेत्री जया प्रदा यांच्यासोबत देखील असंत काही झालं आहे. इयत्ता नववीमध्ये असताना जेव्हा जया प्रदा स्टेजवर डान्स करत होत्या, तेव्हा त्यांना एका सिनेमासाठी ऑफर मिळाली आणि पुढच्या काही काळात त्या बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखीस आल्या. आज जया प्रदा यांना कोणत्याही ओळखची गरज नाही.
शाळेत असताना जया प्रदा जेव्हा स्टेजवर डान्स करत होत्या, तेव्हा त्यांना देखील माहिती नव्हतं की, त्या बॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्री म्हणून स्वतःचं स्थान पक्क करतील. तेव्हा तेलूगू दिग्दर्शक तिळक यांनी जया प्रदा यांना शाळेच्या स्टेजवरून थेट सिनेमाच्या सेटवर पोहोचवलं. सिनेमात त्यांचा फक्त तीन मिनिटांचा सीन होता. पण तेव्हा बॉलिवडला एका नवा चेहरा मिळाला, तो म्हणजे जया प्रदा…
रिपोर्टनुसार, लहान असताना जया प्रदा यांना गाण्याचा छंद होताय. छंद जोपासण्यासाठी त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला. त्यांच्या घराजवळ एक गोदावरी पूल होता. जेव्हा जया प्रदा गाण्याच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी घरातून पळून गेल्या, तेव्हा मोठ्या संकटाचा सामना त्यांनी केला. जया प्रदा तेव्हा लहान असल्यामुळे घरातून बाहेर एकटं जाण्याची परवागनी त्यांना नव्हती.
त्यामुळे स्पर्धेत भाग घे पण कोणीतरी मोठं सोबत असायला हवं… अशी जया प्रदा यांच्या आईची अट होती. अखेर जया प्रदा यांच्या आई म्हणाल्या लवकर जा आणि लवकर ये…. जया आपल्या भावासोबत गोदावरीच्या त्या पुलावर पोहोचल्या तेव्हा त्यांना तिथे आधीच ट्रेन उभी असल्याचं दिसलं. जोपर्यंत ट्रेन सुटत नाही तोपर्यंत ते पुढे जाऊ शकत नव्हते. म्हणून जया यांच्या भावाला पूल खालच्या बाजूने क्रॉस करून दुसऱ्या बाजूला जाणं योग्य वाटलं. तेव्हा जया यांचा भाऊ राजा बाबू निघून गेला पण जया तिथेच राहिल्या.
अशा परिस्थिती जया प्रचंड घाबरल्या. भावाच्या मागे त्यांनी उडी मारली. पण ट्रेन सुरु झाल्यानंतर त्या प्रचंड घाबरल्या… अशात जया रेल्वे पटरीवर झोपल्या. पण नशीब बलवत्तर असल्यामुळे ट्रेन थांबली.. अशा प्रकारे त्या धक्कादायक घटनेतून जया प्रदा यांचे प्राण वाचले. आज त्या प्रसिद्ध अभिनेत्री आहेत.