जेनिफर मिस्त्री हिचा गंभीर आरोप, मालिकेच्या सेटवर झाला नट्टू काका यांचा छळ?, घनश्याम नायक यांना देखील…

| Updated on: Jun 03, 2023 | 5:04 PM

तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. तारक मेहता का उल्टा चश्मा मालिका मोठ्या वादात सापडलीये. मालिकेच्या निर्मात्यावर सतत गंभीर आरोप केले जात आहेत. आता नुकताच जेनिफर मिस्त्री हिने धक्कादायक खुलासा केला आहे.

जेनिफर मिस्त्री हिचा गंभीर आरोप, मालिकेच्या सेटवर झाला नट्टू काका यांचा छळ?, घनश्याम नायक यांना देखील...
Follow us on

मुंबई : तारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ही मालिका मोठ्या वादात सापडलीये. तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेला सोडचिठ्ठी दिलेले कलाकार हे सतत मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी (Asit Kumarr Modi) यांच्यावर गंभीर आरोप करताना दिसत आहेत. अगोदर शैलेश लोढा (Shailesh Lodha) यांनी असित मोदी यांच्या विरोधात मोर्चा काढला होता. त्यानंतर अनेक अभिनेत्रींकडून आरोप केले जात आहेत. तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेला चाहत्यांचे मोठे प्रेम मिळते. या मालिकेत मुंबईतील एक सोसायटी ही दाखवण्यात आलीये. या सोसायटीचे नाव गोकुळधाम असे आहे.

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेत मिसेस सोढीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री ही सतत असित कुमार मोदी यांच्यावर गंभीर आरोप करता दिसत आहे. जेनिफर मिस्त्री हिने काही दिवसांपूर्वीच असित कुमार मोदी यांच्यावर थेट लैंगिक छळाचा आरोप केला होता, जेनिफर मिस्त्री हिचे आरोप ऐकून चाहत्यांना मोठा धक्का बसला.

आता नुकताच जेनिफर मिस्त्री हिने अत्यंत मोठा आणि धक्कादायक खुलासा हा नक्कीच केलाय. जेनिफर मिस्त्री हिने म्हटले की, तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेत नट्टू काकाची भूमिका साकारणारे दिवंगत अभिनेते घनश्याम नायक यांच्यासोबत मालिकेच्या सेटवर अत्यंत चुकीचा व्यवहार हा करण्यात आला होता. त्यांचा छळ हा सेटवर केला जात होता.

मालिकेत नट्टू काका हे जेठालालच्या दुकानात मॅनेजर म्हणून काम करत असल्याचे दाखवण्यात आले होते. गेल्या कित्येक वर्षांपासून नट्टू काकाच्या पात्रातून घनश्याम नायक हे प्रेक्षकांचे धमाकेदार पध्दतीने मनोरंजन हे करत होते. जेनिफर मिस्त्रीने म्हटले की, सेटवर घनश्याम नायक हे वयस्कर असूनही त्यांचा छळ हा केला जात होता.

2021 मध्ये घनश्याम नायक यांनी जगाचा निरोप घेतलाय. बरीच वर्षे नट्टू काकाचे पात्र साकारताना घनश्याम नायक हे दिसले होते. घनश्याम नायक यांच्या जागी आता नवीन नट्टू काका हे मालिकेत दाखवले जात आहेत. प्रिया आहूजा हिने देखील असित कुमार मोदी यांच्यावर काही आरोप केले आहेत. प्रिया आहुजा ही मालिकेत रिटाच्या भूमिकेत होती. आता असित कुमार मोदी यांच्या समस्यांमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे.