मुंबई : टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून जेनिफर विंगेट हिचं नाव अव्वल स्थानी आहे. बॉलिवूडच्या अभिनेत्रींना मागे टाकेल असं जेनिफर विंगेट हिचं सौंदर्य आहे. अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत जेनिफर विंगेट हिने चाहत्यांच्या मनात घर केलं. वयाच्या १२ व्या वर्षापासून अभिनेत्रीने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. ‘राजा को रानी से प्यार हो गया’ मालिकेच्या माध्यमातून जेनिफर पहिल्यांदा चाहत्यांच्या भेटीस आली. जेनिफर हिने दिल मिल गए, बेहद, कहीं तो होगा आणि बेपनाह यांसारख्या मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण जेनिफर फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयु्ष्यामुळे देखील तुफान चर्चेत आली. सध्या अभिनेत्री एकटी आयुष्य जगत आहे, पण एक काळ असा होता, जेव्हा जेनिफर अभिनेता करण सिंग ग्रोव्हर यांच्यासोबत चाहत्यांना कपल गोल्स द्यायची.
मालिकाच्या सेटवरच जेनिफर आणि करण सिंग ग्रोव्हर यांची भेट झाली. भेटीचं रुपांतर प्रेमात झालं आणि 2012 मध्ये जेनिफर आणि करण यांनी लग्न केलं. मात्र, दोघांचं नातं फार काळ टिकले नाही आणि ते वेगळे झाले. आता अनेक वर्षांनंतर जेनिफरने करण सिंग ग्रोव्हरसोबत घटस्फोटावर मौन सोडले आहे. यात कोणाचाही दोष नाही, असं अभिनेत्रीचं म्हणणं आहे.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने घटस्फोटाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. ‘मला विश्वास आहे की, इतक्या मोठ्या निर्णयासाठी आम्ही दोघेही तयार नव्हतो. आम्ही दोघेही ते पाऊल उचलायला तयार नव्हतो. आम्ही इतके दिवस मित्र होतो. प्रत्येक वेळी आम्ही भेटायचो. पण ती वेळ एक दुर्दैवी वेळ होती. जे झालं त्यात कोणाचाही दोष नव्हता…’ असं अभिनेत्री जेनिफर विंगेट म्हणाली.
करण सिंग ग्रोव्हर याच्यापासून विभक्त झाल्यानंतर जेफिनरने दुसरं लग्न केलं नाही. अभिनेत्री मुलासोबत आनंदी आयुष्य जगत आहे. तर अभनेता करण सिंग ग्रोव्हर याने बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री बिपाशा बासू हिच्यासोबत लग्न केलं. करण आणि बिपाशा यांच्या लग्नाची तुफान चर्चा रंगली. ३० एप्रिल २०१६ मध्ये दोघांनी लग्न केलं..
लग्नाच्या ६ वर्षांनंतर अभिनेत्रीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. करण आणि बिपाशा यांच्या मुलीचं नाव देवी असं आहे. बिपाशा कायम देवीसोबत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. शिवाय करण देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटो आणि व्हिडीओंमुळे चर्चेत असतो. सध्या करण पत्नी बिपाशा बासू आणि मुलगी देवी यांच्यासोबत आनंदी आयुष्य जगत आहे.