मुंबई | 20 ऑक्टोबर 2023 : अभिनेत्रीने आयुष्यात जे हवं ते मिळवलं. पतीने साथ सोडल्यानंतर देखील मुलांना रॉयल आयुष्य दिलं. एकटीने प्रचंड मेहनत केली आणि मुलांना शिक्षण दिलं, त्यांचे हट्ट पुरवले. ‘सिंगल मदर’ म्हणून मुलांचा सांभाळ करत असताना, अभिनेत्री यशाच्या उच्च शिखरावर पोहोचली. तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही, किंवा भूतकाळात घडलेल्या गोष्टींवर दुःख व्यक्त करत बसली नाही. वयाच्या १६ व्या वर्षी अभिनेत्रीने लग्न केलं आणि त्यानंतर जुळ्या मुलांना जन्म दिला. पतीचं प्रेम तिला मिळू शकलं नाही. एवढंच नाही तर, अभिनेत्रीने कधी दुसऱ्या लग्नाचा देखील विचार केला नाही. अनेक मलिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री ‘बिग बॉस’ची विजेती ठरली. आता अभिनेत्री ‘झलक दिखला जा 11’ मध्ये डान्सने चाहत्यांना घायाळ करण्यात तयार झाली आहे.
‘झलक दिखला जा 11’ या डान्स रिऍलिटी शोचा नवा प्रोमो समोर आल्यापासून अभिनेत्री उर्वशी ढोलकिया हिचं नाव चर्चेत आहे. ‘कसौटी जिंदगी के’ मालिकेत उर्वशी हिने साकारलेल्या कोमोलिकाच्या व्यक्तिरेखेला चाहते आजही विसरु शकलेले नाहीत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त उर्वशी हिची चर्चा रंगलेली आहे.
झगमगत्या विश्वात अभिनेत्रीने यश मिळवलं पण उर्वशी हिला खासगी आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. फार कमी वयात अभिनेत्रीने प्रियकर अनुरुप ढोलकिया याच्यासोबत लग्न केलं. पण त्यांचं लग्न फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी देखील विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घाईघाईत केलेल्या लग्नाचे परिणाम फार वाईट झाले होते.
अभिनेत्रीने जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर उर्वशी ढोलकिया – अनुरुप ढोलकिया यांचा घटस्फोट झाला. उर्वशी हिच्या जुळ्या मुलांची नावे सागर आणि क्षितिज अशी आहेत. २०१८ मध्ये उर्वशीने घटस्फोटाचा निर्णय घेत, दोन मुलांचा सांभाळ ‘सिंगल मदर’ म्हणून केला.
आज अभिनेत्री तिच्या दोन मुलांसोबत आनंदाने आयु्ष्य जगत आहे. घटस्फोटानंतर दुसऱ्या लग्नाचा विचार न करता अभिनेत्रीने फक्त आणि फक्त स्वतःच्या करियरकडे लक्ष केंद्रीत केलं. एवढंच नाही तर, उर्वशीच्या मुलांनी अभिनेत्रीला दुसरं लग्न करण्याचा सल्ला देखील दिला. पण अभिनेत्री कधीही दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही.
सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्री जुळ्या मुलांचा फोटो पोस्ट करत मुलांवर असलेलं प्रेम व्यक्त करताना दिसते. सोशल मीडियावर देखील उर्वशी हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.