India की भारत, अमिताभ बच्चन यांच्यानंतर आता जॉकी श्रॉफ यांची प्रतिक्रिया

| Updated on: Sep 06, 2023 | 1:09 PM

इंडिया हे नाव बदलून आता भारत करण्याबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत. अधिकृतपणे देशाचे नाव आता भारत केलं जाणार आहे.

India की भारत, अमिताभ बच्चन यांच्यानंतर आता जॉकी श्रॉफ यांची प्रतिक्रिया
Follow us on

मुंबई, 6 सप्टेंबर 2023 : देशात सध्या इंडिया हे नाव बदलून भारत करण्याबाबत जोरदार चर्चा सुरु आहेत. भारताचे नाव आता अधिकृतपणे ‘भारत’ करण्यात येणार आहे. यावरून राजकारण तर तापले आहे. पण बॉलिवूड सेलिब्रिटींच्या प्रतिक्रियाही समोर येत आहेत.

अमिताभ बच्चन यांच्यानंतर जॅक श्रॉफ यांनी ही यावर प्रतिक्रिया दिली आहे.  जॅकी श्रॉफ यांनी ‘भारत’ नाव बदलण्यावर आपली प्रतिक्रिया दिली. ‘भारताला भारत म्हणायचे असेल तर त्यात वाईट काहीच नाही.


६६ वर्षीय जॅकी श्रॉफ पुढे म्हणाले की, ‘माझे नाव जॅकी आहे. कोणीत मला जॉकी म्हणतो. कोणी जॅकी म्हणतं. पण त्यामुळे मी बदलणार नाही. आपण कसे बदलू नाव बदलेल, आपण थोडे बदलू.

भारत अनेक नावांनी ओळखला जातो. हिंदुस्थान, हिंद, भारतवर्ष, भरतखंड, भारत… या सर्व नावांमागे एक कथा आहे. 9 सप्टेंबर रोजी G20 शिखर परिषदेत सहभागी होणाऱ्या जगातील नेत्यांसाठी डिनरचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी त्यांना पाठवलेल्या निमंत्रण पत्रिकेवर ‘president of India’ ऐवजी ‘Presidient of Bharat असे लिहिले आहे. आता याला कोणी विरोध करत आहे तर कोणी याचं समर्थन करत आहे.

अमिताभ बच्चन यांचे ट्विट

अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ‘भारत माता की जय.असे पोस्ट केले.  बिग बींच्या पोस्टनंतर यूजर्सनीही यावर प्रतिक्रिया दिल्या. काहींनी त्यांचं समर्थन केले तर काहींनी त्याला विरोध केला.