Jodha Akbar | लग्नानंतर परिधी शर्मा हिला एका कामासाठी पतीने दिले फक्त सहा महिने; कसा होता जोधाचा प्रवास ?

| Updated on: Jul 11, 2023 | 9:14 PM

लग्नानंतर परिधी शर्मा हिने केलं अभिनय क्षेत्रात पदार्पण; पतीने दिले होते फक्त सहा महिने, पण अभिनेत्रीने मानली नाही हार, कसा होता 'जोधा अकबर' मालिकेतील जोधाचा प्रवास?

Jodha Akbar | लग्नानंतर परिधी शर्मा हिला एका कामासाठी पतीने दिले फक्त सहा महिने; कसा होता जोधाचा प्रवास ?
Follow us on

मुंबई : ‘जोधा अकबर’ मालिकेत अभिनेता रजत टोकस याने अकबर तर परिधी शर्मा हिने जोधा या भूमिकेला न्याय दिला. आजही मालिकेतील काही व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ‘जोधा अकबर’ मालिकेनंतर रजत आणि परिधी यांच्या लोकप्रियतेत देखील मोठी वाढ झाली. पण आता दोघे कुठे आहेत, काय करतात? असे अनेक प्रश्न चाहते विचारत असतात. सध्या चर्चा रंगत आहे की, ‘बिग बॉस १७’ मध्ये अभिनेत्री परिधी शर्मा दिसू शकते. पण रंगणाऱ्या सर्व अफवांवर अभिनेत्रीने पूर्णविराम दिला आहे. सध्या सर्वत्र परिधी शर्मा हिची चर्चा रंगत आहे.

‘बिग बॉसबद्दल अद्याप मी विचार केलेला नाही…’ असं अभिनेत्री म्हणाली. तर ‘जोधा अकबर’ मालिकेतील प्रवासाबद्दल देखील अभिनेत्रीने एका मुलाखतीत सांगितलं होतं. परिधी शर्मा हिने लग्नानंतर अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. ज्यामुळे अभिनेत्री तुफान चर्चेत आली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रवासात परिधी हिला पतीची उत्तम साथ मिळाली.

परिधी म्हणाली, ‘माझ्या पतीने मला साथ होती. ते मला म्हणाले सहा महिने आपण प्रतीक्षा करू. आपल्याला सहा महिन्यात ब्रेक नाही मिळाला तर आपण परत घरी जावू. पण मला सहा महिन्यात ब्रेक मिळाला आणि माझं स्वप्न सत्यात उतरलं..’ टीव्ही क्षेत्रात प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळण्याआधी अभिनेत्रीने अनेक ठिकाणी नकाराचा देखील सामना केला. १२ वी नंतर अभिनेत्रीने एकदा ऑडिशन दिलं होतं. पण तेव्हा परिधी हिची निवड झाली नव्हती.

जोधा अकबर या मालिकेच्या माध्यमातून परिधीला सर्वाधिक प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली. मालिकेत ती जोधाच्या भूमिकेत होती. अभिनेत्रीने जोधाच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिले तेव्हा ७ हजार मुली त्या भूमिकेसाठी रांगेत होत्या. पण परिधी हिला पाहिल्यानंतर एकता कपूर हिने ‘हिच माझी जोधा…’ असं म्हणत परिधी शर्मा हिची निवड केली.

जोधा अकबर मालिकेत झळकण्यापूर्वी अभिनेत्रीने करियरच्या सुरुवातील खलनायकाच्या भूमिका देखील साकारल्या होत्या. पहिल्यांदा अभिनेत्री २०१० मध्ये ‘तेरे मेरे सपने’ मध्ये दिसली होती. त्यानंतर अभिनेत्री ‘रुक जाना नही’ मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती.

२०१३ मध्ये मात्र अभिनेत्रीला टीव्ही विश्वात मोठा ब्रेक मिळाला. १८ जून २०१३ मध्ये सुरू झालेल्या ‘जोधा अकबर’ मालिकेने ७ ऑगस्ट २०१५ मध्ये चाहत्यांचा निरोप घेतला. मालिका संपून अनेक वर्षे झाले असले तरी देखील मालिकेतील कालाकारांची चर्चा तुफान रंगलेली असते.