Johnny Depp: मानहानीचा खटला जिंकल्यानंतर जॉनी डेपची वाराणसी रेस्टॉरंटमध्ये पार्टी; खर्च केले तब्बल इतके रुपये

| Updated on: Jun 08, 2022 | 9:40 AM

अँबरने जॉनीला 15 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच जवळपास 116 कोटी रुपये द्यावे, असा आदेश कोर्टाने दिला. या मोठ्या विजयानंतर जॉनीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जॉनीने नुकतीच वाराणसी रेस्टॉरंटमध्ये (Varanasi Restaurant) पार्टी केली आहे.

Johnny Depp: मानहानीचा खटला जिंकल्यानंतर जॉनी डेपची वाराणसी रेस्टॉरंटमध्ये पार्टी; खर्च केले तब्बल इतके रुपये
Johnny Depp
Image Credit source: Instagram
Follow us on

‘पायरेट्स ऑफ कॅरेबियन’ या चित्रपटातून जगभरात लोकप्रिय झालेला हॉलिवूड अभिनेता जॉनी डेप (Johnny Depp) आणि त्याची पूर्व पत्नी अँबर हर्ड (Amber Heard) यांचा खटला जगभरात गाजला. जॉनीने अँबरविरोधातील हा खटला जिंकला असून तिने केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचं ज्युरींना आढळून आलं. अँबरने जॉनीला 15 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच जवळपास 116 कोटी रुपये द्यावे, असा आदेश कोर्टाने दिला. या मोठ्या विजयानंतर जॉनीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जॉनीने नुकतीच वाराणसी रेस्टॉरंटमध्ये (Varanasi Restaurant) पार्टी केली आहे. रेस्टॉरंटचं नाव वाचून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसला ना? तर हे युकेमधील बर्मिंगहम इथलं भारतीय रेस्टॉरंट आहे. या रेस्टॉरंटमध्ये जॉनीने त्याच्या मित्रांसोबत पार्टी केली असून यावेळी त्याने तब्बल 60 हजार डॉलर्स खर्च केले आहेत.

वाराणसी रेस्टॉरंटकडून इन्स्टाग्रामवर याचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. यावेळी जॉनीने रेस्टॉरंटमधल्या कर्मचाऱ्यांसोबतही फोटो काढले. तिथल्या लहान मुलांसाठी त्याने त्याच्या चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉगही बोलून दाखवले. ‘सध्या या जगात सर्वाधिक चर्चेत असलेल्या कलाकाराने आमच्या रेस्टॉरंटला नुकतीच भेट दिली. जॉनी डेप हा अत्यंत विनम्र कलाकार आहे’, असं कॅप्शन या फोटोंना देण्यात आलं.

हे सुद्धा वाचा

आपला खास मित्र जेफ आणि इतर 20 मित्रमैत्रिणींसोबत जॉनी रविवारी या रेस्टॉरंटमध्ये गेला होता. त्यावेळी तो रेस्टॉरंट इतरांसाठी बंद करण्यात आला होता. TMZ ने दिलेल्या वृत्तानुसार, जॉनीने यावेळी एकूण 60 हजार डॉलर्स म्हणजेच जवळपास 46.6 लाख रुपये इतकं बिल भरलं होतं. अँबरविरोधातील मानहानीचा खटला जिंकल्यानंतर जॉनीने जेफच्या लंडनमधील कॉन्सर्टलाही हजेरी लावली होती.

जॉनी डेप-अँबर हर्ड प्रकरण-

2018 मध्ये अँबरने वॉशिंग्टन पोस्टमध्ये एक मोठा लेख लिहिला होता. अँबरने त्यात कौटुंबिक हिंसाचार झाल्याचा आरोप केला होता. मात्र लेखात तिने कोणाच्याही नावाचा उल्लेख केला नव्हता. त्यानंतर जॉनीने अँबरविरोधात मानहानीचा खटला दाखल केला. हा लेख माझ्यासाठी अपमानास्पद आहे आणि त्यामुळे माझ्या करिअरचं नुकसान होतंय, असं त्याने म्हटलं. जॉनीने 50 दशलक्ष डॉलर्सचा खटला दाखल केला. त्याचवेळी अँबरने 100 दशलक्ष डॉलर्सचा खटला दाखल केला. याप्रकरणी कोर्टाने जॉनी डेपच्या बाजूने निकाल दिला. जॉनी आणि अँबर 2012 पासून एकमेकांना डेट करत होते. त्यांनी 2015 मध्ये लग्न केलं. या दोघांचा संसार केवळ दोन वर्षंच टिकला.