मुंबई | विनोदवीर जॉनी लिव्हर यांनी अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आपल्या विनोदबुद्धीने प्रेक्षकांना पोट धरुन हसवणारे जॉनी लिव्हर सध्या एका महत्त्वाच्या कारणामुळे चर्चेत आले आहे. सध्या सर्वत्र जॉनी लिव्हर आणि त्यांचा मुलगा जेसी लिव्हर याची चर्चा रंगत आहे. जॉनी लिव्हर आणि जेसी लिव्हर पहिल्यांदा एकत्र स्क्रिन शेअर करतना दिसणार आहेत. ज्यामुळे प्रेक्षकांच्या मनात देखील जॉनी लिव्हर आणि जेसी लिव्हर यांनी एकत्र स्क्रिनवर पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सध्या सर्वत्र जॉनी लिव्हर आणि जेसी लिव्हर यांच्या आगामी सिनेमाची चर्चा रंगत आहे. जॉनी लिव्हर आणि जेसी लिव्हर स्टारर ‘अफलातून’ सिनेमा २१ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
लेखक, दिग्दर्शक परितोष पेंटर यांनी वडील आणि मुलाला एकत्र आणण्याची किमया केली आहे. आजपर्यंत अनेक वडील आणि मुलाच्या जोडीने मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घातला. आता जॉनी लिव्हर आणि जेसी लिव्हर यांचा ‘अफलातून’ सिनेमा चाहत्यांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. सध्या सर्वत्र ‘अफलातून’ सिनेमाची चर्चा रंगत आहे.
महत्त्वाचं म्हणजे, ‘अफलातून’ सिनेमात देखील जॉनी लिव्हर आणि जेसी लिव्हर वडील आणि मुलाच्या भूमिकेतून चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत. जॉनी लिव्हर ‘नवाब साहब’ च्या भूमिकेत दिसणार असून त्यांच्या मुलाची ‘आफताब’ची भूमिका जेसी लिव्हर याने साकारली आहे. ‘अफलातून’ सिनेमाच्या माध्यमातून कॉमेडीता तडका प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
‘अफलातून’ सिनेमात जॉनी लिव्हर आणि जेसी लिव्हर यांच्यासोबतच सिद्धार्थ जाधव, श्वेता गुलाटी, तेजस्विनी लोणारी, विजय पाटकर, भरत दाभोळकर, परितोष पेंटर, जयेश ठक्कर, विष्णू मेहरा, रेशम टिपणीस महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. सिनेमाचा धमाल टीझर आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
अभिनेता सिद्धार्थ जाधव याने सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर पोस्ट करत कॅप्शनमध्ये, ‘कॉमेडी बघा….कॉमेडी ऐका…. कॉमेडी बोला…घेऊन आलो आहोत अफलातून कॉमेडीचा धमाकेदार टीझर ! अफलातून – २१ जुलैपासून फक्त चित्रपटगृहांत.’ असं लिहिलं आहे. सध्या सर्वत्र ‘अफलातून’ सिनेमाच्या टीझरची चर्चा रंगत आहे.
‘अफलातून’ सिनेमाची टीझर चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. सिद्धार्थ जाधव याच्या पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. ‘अफलातून’ चित्रपटाची कथा-पटकथा परितोष पेंटर यांची असून संवाद संदीप दंडवते यांचे आहेत. प्रेक्षक देखील सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.