एस. एस. राजामौली (SS Rajamouli) दिग्दर्शित ‘RRR’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. ज्युनियर एनटीआर (Jr NTR) आणि रामचरण (Ramcharan) यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर 9 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. जवळपास तीन मिनिटांच्या या ट्रेलरने सर्वांना थक्क केलं होतं. स्वातंत्र्य सैनिक अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असला तरी त्याची संपूर्ण कथा ही काल्पनिक आहे. 1920 चा काळ यामध्ये दाखवण्यात आला आहे. 2020 मध्ये या चित्रपटाचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मात्र या प्रोमोमधील ज्युनियर एनटीआरच्या लूकवरून त्यावेळी मोठा वाद निर्माण झाला होता. कारण या प्रोमोमध्ये, ज्युनियर एनटीआर हा मुस्लीम व्यक्तीच्या भूमिकेत होता. हा संपूर्ण वाद काय होता आणि त्यावर राजामौली काय म्हणाले, ते जाणून घेऊयात..
राजामौलींनी तथ्यांशी केली छेडछाड?
22 ऑक्टोबर, कोमाराम भीम यांच्या जयंतीदिनी RRR या चित्रपटातील ज्युनियर एनटीआरच्या भूमिकेचा फर्स्ट लूक प्रोमोद्वारे प्रदर्शित करण्यात आला होता. हा प्रोमो प्रदर्शित होताच अवघ्या काही तासांत त्यावरून वाद निर्माण झाला होता. राजामौलींनी चित्रपटाच्या कथेत फेरफार केला, तथ्यांशी छेडछाड केली असा आरोप करत काही राजकारण्यांनी त्याला विरोध केला. तेलंगणामधील सिद्धीपेट इथले (टीएस) भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि करीमनगरचे खासदार बंदी संजय यांनी त्यावर आक्षेप नोंदवला.
एका निवडणूक रॅलीत ते म्हणाले, “कोमाराम भीम हे वीर योद्धा होते आणि त्यांना टोपी, सूरमामध्ये दाखवणं हे आम्हाला मान्य नाही. राजामौली हैदराबादच्या एखाद्या मुस्लिम नेत्याला किंवा निजाम राजवटीतल्या कोणत्याही नवाबला घेऊन, त्याच्या कपाळावर टिळक आणि कुंकू दाखवून चित्रपट करू शकतात का?” राजामौली यांनी ही दृश्यं न हटवल्यास भाजपचे कार्यकर्ते चित्रपटाच्या प्रदर्शनाला आक्षेप घेतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं. या वादाचा एस. एस. राजामौली आणि त्यांच्या संपूर्ण टीमवर कोणताही फरक पडला नाही. काही काळानंतर त्यांनी फिल्म कम्पॅनियनला दिलेल्या मुलाखतीत, ज्युनियर एनटीआरला तशा पोशाखात दाखवण्यामागचं कारण उघड केलं.
वादावर राजामौली आणि RRRच्या लेखकांची प्रतिक्रिया-
वास्तविक जीवनात, कोमाराम भीम यांनी आदिवासींसाठी लढा दिला आणि निजामांविरुद्ध बंड केलं होतं. ज्युनियर एनटीआरच्या कोमाराम भीमला मुस्लीम व्यक्ती म्हणून दाखवण्यामागचं कारण स्पष्ट करताना पटकथालेखक विजयेंद्र प्रसाद म्हणाले, “ज्या गोष्टी ऐकिवात आल्या आहेत, त्यावरून ते वाद निर्माण करत आहेत. RRR मध्ये हैदराबादचा निजाम हा कोमाराम भीम यांच्या शोधात असतो. त्यांच्यापासून वाचण्यासाठी ते स्वत:ला मुस्लिम म्हणून दाखवतात. जेणेकरून त्यांला पकडलं जाऊ नये आणि फाशीची शिक्षा होऊ नये.”
#RRR Day 1 biz… Gross BOC…
⭐ #AP: ₹ 75 cr
⭐ #Nizam: ₹ 27.5 cr
⭐ #Karnataka: ₹ 14.5 cr
⭐ #TamilNadu: ₹ 10 cr
⭐ #Kerala: ₹ 4 cr
⭐ #NorthIndia: ₹ 25 cr#India total: ₹ 156 cr⭐ #USA: ₹ 42 cr
⭐ Non-US #Overseas: 25 cr
WORLDWIDE TOTAL: ₹ 223 cr pic.twitter.com/B7oAjPXj40— taran adarsh (@taran_adarsh) March 26, 2022
RRRच्या ट्रेलरमध्ये मात्र कुठेही ज्युनियर एनटीआरला मुस्लीमच्या भूमिकेत दाखवण्यात आलं नव्हतं. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जगभरात तब्बल 223 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. यामध्ये आलिया भट्ट, अजय देवगण, मकरंद देशपांडे यांच्याही भूमिका आहेत.
हेही वाचा:
श्रेयस तळपदे ते मुक्ता बर्वे.. मराठी टीव्ही इंडस्ट्रीत सर्वाधिक मानधन घेणारे कलाकार