‘जुडवा’ फेम रंभाची लेक म्हणजे सौंदर्याची खाण, फोटो पाहताच चाहते म्हणाले…

| Updated on: Feb 19, 2024 | 10:43 AM

Judwaa fame Actress Rambha Daughter Lavanya Pics : 'जुडवा' फेम रंभा हिच्या लेकीचं हटके ट्रांसफॉर्मेशन, आईपेक्षा अधिक ग्लॅमरस, फोटो सर्वत्र तुफान व्हायरल, सध्या सर्वत्र रंभा हिच्या लेकीच्या चर्चा

जुडवा फेम रंभाची लेक म्हणजे सौंदर्याची खाण, फोटो पाहताच चाहते म्हणाले...
Follow us on

मुंबई | 19 फेब्रुवारी 2024 : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री, अभिनेते नाही तर, त्यांच्या मुलांच्या चर्चा रंगत आहे. अभिनेत्री रवीना टंडन हिची लेक राशा थडानी, अभिनेत्री काजोल हिची लेक निसा देवगन कायम चर्चेत असतात. पण ‘जुडवा’ फेम अभिनेत्री रंभा आता अभिनय विश्वापासून दूर कुटुंबासोबत आनंदाने राहत आहेत. अभिनेत्री आता लाईमलाईटपासून देखील दूर असते. पण आता रंभा तिच्या लेकीमुळे चर्चेत आली आहे. रंभा हिच्या लेकीच्या सौंदर्यापुढे बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री देखील फेल आहेत.

90 च्या दशकात रंभा हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आता अभिनेत्री तिच्या मुलीमुळे चर्चेत आहे. रंभा हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटोमध्ये रंभा हिचा मोठी मुलगी लावण्या हिचं सौंदर्य चाहत्यांच्या समोर आलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त लावण्या हिच्या सौंदर्याची चर्चा रंगली आहे.

हे सुद्धा वाचा

रंभा हिने इन्स्टाग्रामवर कुटुंबासोबत काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्रीचं संपूर्ण कुटुंब पूजा करताना दिसत आहे. कुरळे केस, गोल चेहरा आणि चष्मा, गुलाबी रंगाचा लेहेंगा… रंभाची मुलगी लावण्या खूपच सुंदर दिसते. रंभाच्या दुसऱ्या बाजूला तिची धाकटी मुलगी साशा उभी आहे, जिने हिरव्या रंगाचा लेहेंगा घातला आहे.

 

 

रंभा हिला दोन मुली आणि एक लहान मुलगाही आहे. रंभाची मोठी मुलगी लावण्या हुबेहूब आईसारखी दिसत आहे. सोशल मीडियावर अभिनेत्री आणि तिच्या लेकीचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर नेटकरी अभिनेत्रीच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

बॉलीवूड अभिनेत्री रंभाने 1992 मध्ये तेलुगू सिनेमातून करिअरची सुरुवात केली. त्यानंतर अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 1995 मध्ये जल्लाद या सिनेमातून अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर रंभा हिने जुडवा, बंधन, घरवाली-बाहरवाली यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं.

बॉलिवूडमध्ये सक्रिय असताना रंभा हिने 8 एप्रिल 2010 मध्ये उद्योजक इंद्रकुमार पद्मनाथन यांच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर रंभा हिने बॉलिवूडचा निरोप घेतला आणि पतीसोबत कॅनडा याठिकाणी गेली. अभिनेत्री आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. अभिनेत्री कायम कुटुंबासोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.