जुही चावलाच्या वडिलांनी नाकारलं होतं सलमानचं स्थळ; बऱ्याच वर्षांनंतर अभिनेत्रीने सांगितलं खरं कारण

| Updated on: Apr 12, 2023 | 2:53 PM

जुही चावलाने 1988 मध्ये 'कयामत से कयामत तक' या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. तर सलमानने त्याच वर्षी 'बीवी हो तो ऐसी' या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. मात्र आपल्या संपूर्ण करिअरमध्ये या दोघांनी एकत्र काम केलं नाही.

जुही चावलाच्या वडिलांनी नाकारलं होतं सलमानचं स्थळ; बऱ्याच वर्षांनंतर अभिनेत्रीने सांगितलं खरं कारण
Salman Khan and Juhi Chawla
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई : सलमान खान आणि जुही चावला यांनी बॉलिवूडमध्ये जवळपास एकाच वेळी करिअरची सुरूवात केली होती. मात्र या दोघांनी एकत्र कोणत्याच चित्रपटात काम केलं नाही. सलमानचा एक जुना व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये तो म्हणाला होता की जुही चावलाच्या वडिलांकडे त्याने अभिनेत्रीचा लग्नासाठी हात मागितला होता. मात्र त्यांनी लग्नास नकार दिला होता. आता त्यावर जुहीने प्रतिक्रिया दिली आहे. सलमानसोबत एकही चित्रपटात काम का करू शकली नाही, याचंही कारण तिने सांगितलं.

काय म्हणाली जुही चावला?

जुहीबाबत सलमान म्हणाला होता, “ती खूपच प्रेमळ आहे. मी तिच्या वडिलांकडे जुहीसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र त्यांनी मला नकार दिला. इतकंच नव्हे तर एका चित्रपटात माझ्यासोबत तिची मुख्य भूमिका होती. पण तिने त्यात काम करण्यास नकार दिला होता.” आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जुहीला सलमानच्या लग्नाच्या प्रपोजलविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली, “तेव्हा मी माझ्या करिअरची सुरुवात केली होती आणि इंडस्ट्रीत मी फार कोणाला ओळखायची नाही. तेव्हा तर सलमानसुद्धा ‘द सलमान खान’ नव्हता. माझ्याकडे एका चित्रपटाची ऑफर आली होती, ज्यामध्ये तो मुख्य भूमिकेत होता. मात्र काही कारणामुळे तेव्हा मला त्यात काम करणं शक्य झालं नाही. पण त्यावेळी मी इंडस्ट्रीत कोणालाच ओळखायची नाही.”

जुही चावलाने 1988 मध्ये ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. तर सलमानने त्याच वर्षी ‘बीवी हो तो ऐसी’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. मात्र आपल्या संपूर्ण करिअरमध्ये या दोघांनी एकत्र काम केलं नाही. जुहीच्या ‘दिवाना मस्ताना’ या चित्रपटात फक्त त्याने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती.

हे सुद्धा वाचा

सलमानसोबत चित्रपट करण्यास नकार दिल्याबद्दल जुही म्हणाली, “..आणि आजपर्यंत मला त्या गोष्टीची आठवण करून देण्याची एकही संधी तो सोडत नाही. तू माझ्यासोबत चित्रपट केला नाहीस, असं तो सतत म्हणत असतो. आम्ही जरी एकत्र चित्रपटात काम केलं नसलं तरी आम्ही बरेच स्टेज शो एकत्र केले आहेत. माझ्या दिवाना मस्ताना या चित्रपटात त्याचा कॅमिओ होता.”

जुही आता फार क्वचित मोठ्या पडद्यावर दिसून येते. शेवटचं तिने 2022 मध्ये ऋषी कपूर यांच्यासोबत ‘शर्माजी नमकीन’ या चित्रपटात काम केलं होतं. तर दुसरीकडे सलमान खानचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट येत्या 21 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.