मुंबई | 8 डिसेंबर 2023 : बॉलिवूडमध्ये काम करावं, स्वतःचं नाव कमवावं, बक्कळ पैसा कमवावा अशी अनेकांची इच्छा असते… काही लोकांची ही इच्छा सहज पूर्ण होते, काहींना प्रचंड मेहनत करावी लागते… पण काहींना तर बॉलिवूडमध्ये करियर करण्याची देखील परवानगी नसते… अनेक जण मोठी स्वप्न पाहात मायानगरीत येतात… पण सगळ्यांना यश मिळत नाही… काही मात्र सर्वत्र चमकतात… असंच काही अभिनेते ज्युनियर महमूद (junior mehmood) यांच्यासोबत देखील झालं आहे. ज्युनियर महमूद आज या जगात नसले तरी, त्यांच्या अनेक आठवणी चाहत्यांच्या मनात कायम राहातील.
बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता, जेव्हा ज्युनियर महमूद यांचं हिंदी कलाविश्वावर वर्चस्व होतं. पण ‘मेरा नाम जोकर’, ‘परवरिश’, ‘हाथी मेरे साथी’ यांसारख्या सिनेमामध्ये महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या ज्युनियर महमूद यांचं खरं नाव नईम सैय्यद असं आहे. पहिल्या सिनेमानंतर नईम सैय्यद यांना ज्युनियर महमूद असं नाव पडलं.
तर ज्युनियर महमूद यांच्या निधनानंतर जाणून घेऊ त्यांच्या नावामागे नक्की काय रहस्य होतं. नईम सैय्यद यांचा जन्म 1956 साली झाला. वयाच्या 9 व्या वर्षी ज्युनियर महमूद यांनी बालकलाकार म्हणून केली. त्यानंतर 1968 साली ‘सुहाग की रात’ सिनेमा प्रदर्शित झाला आणि या सिनेमात ज्युनियर महमूद यांना अभिनेते आणि गायक महमूद यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली.
‘सुहाग की रात’ सिनेमातील ज्युनियर महमूद यांच्या भूमिकेला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. त्यानंतर गायक महमूद यांनी ज्युनियर महमूद यांनी लेकीच्या वाढदिवसासाठी घरी बोलावलं. तेव्हा ज्युनियर महमूद यांनी ‘हम काले हैं तो क्या हुआ…’ गाण्यावर भन्नाट डान्स केला आणि गायम महमूद यांच्या मनावर राज्य केलं. तेव्हा महमूद यांनी नईम सैय्यद यांना ज्युनियर महमूद असं नाव दिलं.
गायक महमूद यांनी दिलेल्या नावानंतर अभिनेत्याने देखील स्वतःचं नाव बदललं नाही. नईम सैय्यद यांनी ज्युनियर महमूद म्हणून स्वतःची इंडस्ट्रीमध्ये ओळख निर्माण केली. पहिल्या सिनेमानंतर ज्युनियर महमूद यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. एक काळ असा होता जेव्हा ज्युनियर महमूद यांनी बॉलिवूडवर राज्य केलं.
ज्युनियर महमूद यांचे मोठे भाऊ सिनेमांच्या सेटवर फोटोग्राफी करायचे. त्यामुळे ज्युनियर महमूद अनेकदा सेटवर भावासोबत जायचे. एकदा ज्युनियर महमूद ज्या सेटवर गेले होते, त्या सेटवर एका बालकलाकाराच्या भूमिकेसाठी शुटिंग सुरु होती. पण त्या बालकलाकाराला डायलॉय जमत नव्हते.
शुटिंग सुरु असताना ज्युनियर महमूद उभे राहिले आणि म्हणाले एवढंच तर बोलायचं आहे… तेवढ्यात दिग्दर्शकाचं लक्ष ज्युनियर महमूद यांच्याकडे गेलं आणि ती सुवर्ण संधी ज्युनियर महमूद यांना मिळाली. वयाच्या 9 व्या वर्षी ‘मोहब्बत जिंदगी है’ सिनेमात ज्युनियर महमूद यांनी भूमिका साकारली आणि अभिनयात करियरला सुरुवात केली.