धक्कादायक…! प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या निधनानंतर पत्नीने देखील घेतला अखेरचा श्वास

| Updated on: Feb 28, 2023 | 12:22 PM

प्रसिद्ध दिग्दर्शकाचं २ फेब्रुवारी रोजी निधन झाल्यानंतर पत्नीने देखील घेतला अखेरचा निरोप... शेवटच्या क्षणी 'या' अभिनेत्याने घेतली त्यांची भेट... फोटो व्हायरल

धक्कादायक...! प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या निधनानंतर पत्नीने देखील घेतला अखेरचा श्वास
Follow us on

K Viswanath Wife Passed Away : टॉलिवूड सिनेविश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शक के. विश्वनाथ यांचं २ फेब्रुवारी २०२३ रोजी निधन झालं. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या नंतर के. विश्वनाथ यांच्या पत्नी यांनी देखील जगाचा अखेरचा निरोप घेतला आहे. के. विश्वनाथ यांच्या पत्नी काशीनाथुनी जयलक्ष्मी (jayalakshmi) यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. २७ फेब्रुवारी रोजी हैदराबाद याठिकाणी काशीनाथुनी जयलक्ष्मी यांनी अखेरचा श्वास घेतला. काशीनाथुनी जयलक्ष्मी यांच्या निधनानंतर सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहत आहेत. काशीनाथुनी जयलक्ष्मी यांच्या निधनानंतर टॉलिवूडमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

काशीनाथुनी जयलक्ष्मी (jayalakshmi) या कुरनूल जिल्हा येथील रहिवासी होत्या. त्याचे वडील एक स्टेशन मास्तर होते. काशीनाथुनी जयलक्ष्मी यांना दोन मुलं आणि एक मुलगी आहे. रवींद्रनाथ विश्वनाथ, नागेंद्रनाथ विश्वनाथ अशी त्यांच्या मुलांची नावे असून पद्मावती विश्वनाथ असं त्यांच्या मुलीचं नाव आहे. काशीनाथुनी जयलक्ष्मी यांना ६ नातवंड आहेत.

हे सुद्धा वाचा

 

काही दिवसांपूर्वी पवन कल्याण आणि चिरंजीवी (Chiranjeevi) यांनी काशीनाथुनी जयलक्ष्मी यांच्या प्रकृती विचारपूस करण्यासाठी त्यांची भेट घेतली. सध्या त्यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटोमघ्ये चिरंजीवी यांनी काशीनाथुनी जयलक्ष्मी यांचा हात धरला आहे. हा इमोशनल फोटो सध्या चर्चेत आहे.

 

 

काशीनाथुनी जयलक्ष्मी यांचे पती आणि दिवंगत दिग्दर्शक के. विश्वनाथ यांना त्यांच्या मोलाच्या कामगिरी निमित्त दादा साहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. शिवाय के. विश्वनाथ यांना 1992 मध्ये पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. अनेक फिल्मफेअर आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसह देखील त्यांना गैरवण्यात आलं. साऊथ सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी दिग्दर्शकाच्या निधनावर श्रद्धांजली वाहिली होती.

सध्या सर्वत्र काशीनाथुनी जयलक्ष्मी यांच्या निधनाची चर्चा सुरु आहे. पतीच्या निधनानंतर काही दिवसांनंतर काशीनाथुनी जयलक्ष्मी यांनी वयाच्या ८६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात.