‘कांटा लगा’ हे गाणं तुमच्या आजही लक्षात असले. अभिनेत्री शेफाली जरिवाला हिने ‘कांटा लगा’ गाण्यावर भन्नाट डान्स करत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आजही कोणत्या कार्यक्रमात ‘कांटा लगा’ गाण्यावर चाहते ताल धरतात. पण ‘कांटा लगा गर्ल’ आता काय करते? कशी दिसते? असा प्रश्न देखील अनेकांना पडला. 2003 मध्ये ‘कांटा लगा गाणं’ प्रदर्शित झालं होतं. तेव्हा शेफाली हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आपल्या भन्नाट डान्स आणि घायाळ अदांनी शेफालाने चाहच्यांच्या मनात घर केलं. आजही अभिनेत्री कायम चर्चेत असते. शेफालीने छोट्या पडद्यावर देखील तुफान कामगिरी केली. बिग बॉसमध्ये शेफालीने तिच्या खास अंदाजात चाहत्यांच लक्ष वेधलं.
शेफाली जरिवाला आता जाहिराती, कार्यक्रमाच्या माध्यमातून कमाई करते. आता शेफाली हिला पाहिल्यानंतर तुम्ही देखील थक्क व्हाल. वयाच्या 41 व्या वर्षी देखील शेफालीचं सौंदर्य कमी झालेलं नाही. नुकताच झालेल्या मुलाखतीत शेफाली हिने स्वतःमध्ये झालेल्या ट्रान्सफॉरमेशनबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. अभिनेत्री स्वतःला आणखी सुंदर करण्यासाठी लिप फिलर्स आणि बोटॉक्स केलं आहे. ही पूर्ण प्रक्रिया प्रचंड त्रासदायक असते. असं देखील अभिनेत्री म्हणाली.
शेफाली म्हणाली, ‘लिप फिलर्स आणि बोटॉक्स आजच्या घडीला प्रत्येक जण करत आहे. ज्यामुळे व्यक्तीचं सौंदर्य आणखी वाढतं आणि यामध्ये काहीही चुकीचं नाही. ही प्रक्रिया फार त्रासदायक असते. मी पहिल्यापासून माझ्या सौंदर्याची काळजी घेतली आहे. मी लिप फिलर आणि बोटॉक्स केलं आहे की नाही… हे मी सांगू शकत नाही. पण केल्यानंतर तुमचं सौंदर्य नक्की वाढेल एवढं मी सांगू शकते…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.
शेफाली जरिवाली हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, शेफाली हिने अभिनेता पराग त्यागी याच्यासोबत लग्न केलं. अभिनेत्री तिच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहे. शेफाली कायम पराग याच्यासोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.
शेफाली कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. इन्स्टाग्रामवर शेफालीचे 3.2 मिलियन फॉलोअर्स आहेत, तर अभिनेत्री फक्त 160 लोकांना फॉलो करते. सोशल मीडियावर शेफाली हिचे फोटो तुफान व्हायरल होत असतात.