‘कभी खुशी कभी गम’ (Kabhi Khushi Kabhie Gham) सिनेमा तर तुम्हाला आठवत असलेच. महानायक अभिताभ बच्चन, जया बच्चन, शाहरुख खान, काजोल, करीना कपूर, हृतिक रोशन स्टारर सिनेमाने चाहत्यांचं उत्तम मनोरंजन केलं होतं. सिनेमात बालकलाकाराची भूमिका साकारणाऱ्या जिब्रान खान (Jibraan Khan) याने देखील चाहत्यांचं भरभरुन मनोरंजन केलं. 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कभी खुशी कभी गम’ सिनेमात जिब्रान याने शाहरुख खान आणि काजोल यांच्या मुलाची भूमिका साकारली होती.
‘कभी खुशी कभी गम’ सिनेमात क्यूट आणि गोंडस दिसणारा जिब्रान आता 30 वर्षांचा झाला आहे. सोशल मीडियावर जिब्रान याने फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात. आता जिब्रान याला ओळखण देखील कठीण झालं आहे. जिब्रान आता प्रचंड हँडमस दिसतो.
जिब्रान सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. सोशल मीडियावर जिब्रान याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी जिब्रान कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. चाहते देखील अभिनेत्याच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.
सांगायचं झालं तर, ‘कभी खुशी कभी गम’ या सिनेमाच जिब्रान याने राहुल आणि अंजली यांचा मुलगा क्रिश रायचंदची भूमिका साकारली होती. एवढंच नाहीतर, ‘महाभारत’ या टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिकेत अर्जुनची भूमिका साकारणारे अभिनेते फिरोज खान हे जिब्रानचे वडील आहेत.
‘कभी खुशी कभी गम’ या सिनेमानंतर जिब्रान याने अन्य सिनेमांमध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. क्यूँ की मै झूट नही बोलता (2001), रिश्ते (2002) यांमध्येही त्याने भूमिका साकारल्या होत्या. जिब्रान याला अभिनयात रस आहे.
आता जिब्रान लवकरच ‘इश्क विश्क’ या सिनेमाच्या सीक्वेलमध्ये (Ishq Vishk sequel) दिसणार आहे. सिनेमा 28 जून 2024 मध्ये प्रदर्शित होणार असल्याची चर्चा रंगली आहे. सिनेमात रोशन कुटुंबातील ही स्टारकिड आहेत. राकेश रोशन, राजेश रोशन आणि हृतिक रोशननंतर आता पश्मिना रोशन सिनेसृष्टीत पदार्पण करतेय. त्यामुळे सिनेमा कधी प्रदर्शित होतोय या प्रतीक्षेत चाहते आहेत.