मुंबई : बॉलिवूडमधील अनेक अभिनेते त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आले. अशाच अभिनेत्यांपैकी एक म्हणजे कबीर बेदी. कबीर बेदी अनेकदा त्यांच्या खासगी आयुष्यामुळे वादाच्या भोवऱ्यार राहिले. कबीर बेदी यांनी वयाच्या ७० व्या वर्षी चौथं लग्न केलं. कबीर बेदी यांची चौथी पत्नी त्यांच्यापेक्षा जवळपास २९ वर्ष लहान आहे. कबीर यांच्या चौथ्या पत्नीचं नाव परवीन दुसांझ आहे. परवीन एक प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री होती. जवळपास १० वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर कबीर बेदी आणि परवीन यांना २०१६ मध्ये लग्न केलं.
कबीर यांचं पहिलं लग्न १९६९ साली प्रोतिमा बेदी यांच्यासोबत झालं. प्रोतिमा बेदी एक प्रसिद्ध ओडिशी डान्सर होत्या. पण त्यांचं नातं जास्त काळ टिकलं नाही. १९७४ मध्ये प्रोतिमा आणि कबीर यांनी घटस्फोट घेतला आणि विभक्त झाले. त्यानंतर कबीर यांनी दुसरं लग्न मूळची ब्रिटीश असणाऱ्या फॅशन डिझायनर सुजान हम्प्रेज यांच्या सोबत केलं पण हे लग्न देखील जास्त काळ टिकू शकलं नाही.
दुसरं लग्न अपयशी ठरल्यानंतर कबीर बेदी यांनी १९९२ साली तिसरं लग्न केलं. टीव्ही आणि रेडियो प्रेजेंटर निक रिड्ससोबत केलं. पण कबीर यांचं तिसरं लग्न देखील अपयशी ठरलं. २००५ मध्ये तिसऱ्यांदा घटस्फोट झाल्यानंतर कबीर यांनी २०१६ मध्ये परवीन यांच्यासोबत चौथं लग्न केलं.
कबीर बेदी यांना कायम त्यांच्या चार लग्नांबद्दल विचारण्यात आलं. चार लग्नांवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर कबीर यांनी ‘कोणतही लग्न वन नाइट स्टँड नव्हतं, प्रत्येक पत्नीसोबत माझं नातं अधिक काळ होतं.. असं वक्यव्य कबीर बेदी यांनी केल्याचं सांगण्यात येतं.
कबीर यांचा मुलगा सिद्धार्थने आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं होतं. मुलाच्या मृत्यूनंतर ते याप्रकरणी फारसे कधी व्यक्त झाले नव्हते. ‘स्टोरीज आय मस्ट टेल’ या आत्मचरित्राबद्दलही त्यांनी मोकळेपणे भाष्य केलं. 1997 मध्ये कबीर बेदी यांचा मुलगा सिद्धार्थने आत्महत्या केली होती.
एका मुलाखतीत त्यांनी मुलाच्या निधनाबद्दल स्वत:च्या मनात अपराधीपणाची भावना असल्याचं म्हटलं.. सिद्धार्थ हा कबीर बेदी आणि त्यांची पहिली पत्नी प्रोतिमा यांचा मुलगा होता. 1990 मध्ये त्याने कार्नेगी मेलॉन विद्यापीठात शिक्षण घेतलं आणि नंतर त्याला स्किझोफ्रेनिया असल्याचं निदान झालं होतं. वयाच्या 26 व्या वर्षी त्याने आत्महत्या केली होती.