मुंबईः कच्चा बादाम गाणे ज्यांनी गायिले आहे ते गायक भूबन बड्याकर (singer bhuban Badayakar ) यांचा सोमवारी रात्री अपघात (Accident )होऊन जखमी झाले. या अपघातानंतर त्यांना पश्चिम बंगालमधील बीरभूममधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या अपघातानंतर असे समजले की, ते एक जुनी कार घेऊन चालवण्यास शिकत होते. त्यांच्या कारचा अपघात झाल्यानंतर त्यांच्या छातीला आणि दोन ठिकाणी जखम झाली आहे. सध्या ते रुग्णालयात दाखल झाले असून त्यांची तब्बेत सुधारत असल्याचे डॉक्टरांना सांगितले आहे.
कच्चा बादाम (Kacha Badam)हे गाणं म्हणून ज्यांनी सगळा सोशल मीडिया कच्चा बादाममय करुन टाकला होता, ते भूबन बड्याकर हे पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील कुरालजुरी गावातील राहणारे आहेत. त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांची पत्नी, दोन मुलगे आणि एक मुलगी असा परिवार आहे. भूबन अजूनपर्यंत शेंगदाणे विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.
सोशल मीडियाच्या या काळात आपल्याला ग्राहक मिळावा म्हणून त्यांनी काचा बादाम हे लिहून त्या गीताला त्यांनी आपल्याच आवाजात सूरबद्ध केले. त्यानंतर हे गाणं बघणाऱ्या आणि ऐकणाऱ्यांनी हे गाणं सोशल मीडियावर शेअर केले. ते बघता बघता इतके व्हायरल झाले की, त्याचे रसिक अगदी परदेशातही झाले, आणि शेंगदाणे विकणारा भूबन हा अख्ख्या जगात प्रसिद्ध झाला. कचा बादाम हे गाणं गाऊन रातोरात सेलेब्रिटी झालेले भूबन यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. ते शेंगदाणे विकून आपले घर चालवतात. त्यांचे गाणे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते, त्यांच्या या गाण्याची भूरळ दिग्गज कलाकारांनाही पडली होती.
त्यांचे गाणे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एका म्युझिक कंपनीने त्यांना लाखो रुपयांचा चेक दिला आणि त्यांच्या सोबत गाण्यांचा व्हिडिओ केला. त्यांच्या या गाण्यानंतर त्यांना अनेक टीव्हीच्या कार्यक्रमातून त्यांना संधी मिळू लागली.
सध्या त्यांची आर्थिक परिस्थिती उत्तम नसली तरी त्यांनी आता शेंगदाणे विकणे बंद केले आहे. ते म्हणतात की आता मी शेंगदाणे विकणे बंद केले आहे, कारण आता अनेक जण मी सेलिब्रेटी असल्यासारखा माझ्यासोबत सेल्फी घेतात. ते बडे सेलिब्रेटी नसले तरी त्यांना आता सरकारने आपल्याला कायमस्वरुपी एक घर द्यावे अशी त्यांची एक इच्छा आहे.
संबंधित बातम्या
“आमच्या सुविद्य पत्नी संयोगिताराजेंनी माझ्यावर गनिमी कावा केला”, संभाजी छत्रपती असं का म्हणाले?
‘डॉक्टर मारायच्या लायकीचे, त्यांच्याकडे कधी जाऊ नका!’ संभाजी भिडेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य