मुंबई | 1 ऑगस्ट 2023 : अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री काजोल स्टारर ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ सिनेमाला आजही चाहते विसरु शकलेले नाहीत. सिनेमातील शाहरुख – काजोल यांच्या केमिस्ट्रीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं होतं. सिनेमातील डायलॉग, गाणी, मैत्री, प्रेम, लग्नाभोवती फिरणाऱ्या सिनेमाने चाहत्यांचं भरभरुन कौतुक केलं. १९९५ साली प्रदर्शित झालेल्या सिनेमाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. सिनेमाला प्रदर्शित होवून जवळपास २८ वर्ष झाली आहेत. पण आजही सिनेमातील छोट्या – मोठ्या गोष्टी चाहत्यांसमोर येत असतात.
एका मुलाखतीत काजोल हिने सिनेमासंबंधीत एक किस्सा चाहत्यांसोबत शेअर केला होता. पोस्टर शूट दरम्यान शाहरुख खान याने काजोल हिला खांद्यावर उचलून घेतलं होतं. शाहरुख खांद्यावर उचलून घेणार या विचारत फोटोंसाठी पोज कशी द्यायची असा प्रश्न अभिनेत्रीला पडला होता.
१९९५ साली प्रदर्शित झालेल्या दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे सिनेमाच्या फोटोशूटबद्दल सांगताना काजोल म्हणाली, ‘एकीकडे शाहरुख खान मला घेवून उभा होता, तर दुसरीकडे मला त्याच्यासाठी प्रचंड वाईट वाटत होतं. मी विचार करुनच घाबरली होती.. शाहरुख मला उचलू शकेल? मी सतत त्याला विचारत होती..’
पुढे काजोल म्हणाली, ‘मी शाहरुखला असं कसं विचारू शकते… असा देखील विचार करत होती. पण तेव्हा शाहरुख मला म्हणाला घाबरु नको मी स्ट्रॉन्ग आहे. मी फोटोशूटसाठी जेव्हा स्टूडिओमध्ये गेली तेव्हा शाहरुख याने मला प्रेमाने वागवलं. शाहरुखने मला खांद्यावर उचललं आणि त्याने मला असहज वाटू दिलं नाही..’ असा विनोदी किस्सा अभिनेत्रीने चाहत्यांसोबत शेअर केला. (dilwale dulhania le jayenge scenes)
प्रचंड विनोदी अंदाजात ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ सिनेमाच्या पोस्टरचं फोटोशूट पूर्ण झालं. ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ सिनेमाने चाहत्यांचं भरभरुन मनोरंजन केलं. आजही चाहते ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ सिनेमा तितक्याच आवडीने पाहतात.
‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ सिनेमाशिवाय काजोल आणि शाहरुख यांनी ‘बाजीगर’, ‘करण – अर्जुन’, ‘कुछ-कुछ होता है’, ‘दिलवाले’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. चाहत्यांनी देखील काजोल आणि शाहरुख यांच्या जोडीला डोक्यावर घेतलं. (dilwale dulhania le jayenge)
आजही शाहरुख – काजोल यांच्या मैत्रीच्या चर्चा रंगलेल्या असतात. सोशल मीडियावर देखील दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. चाहते देखील दोघांच्या आगामी सिनेमांच्या प्रतीक्षेत असतात.