Ajay Devgan याच्यासोबत नाही तर, श्रीमंत उद्योजकासोबत झालं असतं काजोलचं लग्न पण…

| Updated on: Oct 23, 2023 | 6:15 PM

Ajay Devgan | आज काजोल अभिनेता अजय देवगन याची नाही तर, श्रीमंत उद्योजकासोबत झालं असतं लग्न.., खुद्द अभिनेत्रीने सांगितलं तिच्या एक्स-बॉयफ्रेंडबद्दल... सध्या सर्वत्र काजोल हिच्या खासगी आयुष्याची चर्चा... आज अभिनेत्री आहे तिच्या आयुष्यात आनंदी...

Ajay Devgan याच्यासोबत नाही तर, श्रीमंत उद्योजकासोबत झालं असतं काजोलचं लग्न पण...
Follow us on

मुंबई | 23 ऑक्टोबर 2023 : बॉलिवूडमध्ये काही कपल असे आहेत जे कायम चाहत्यांना कपल गोल्स देत असतात. अशाच कपल्स पैकी एक म्हणजे अभिनेता अजय देवगन आणि अभिनेत्री काजोल….. काजोल आणि अजय यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. १९९९ मध्ये काजोल आणि अजय विवाहबंधनात अडकले. अजय – काजोल यांना दोन मुलं देखील आहेत. काजोल आज तिच्या कुटुंबासोबत आनंदी आयुष्य जगत आहे. पण एक काळ असा होता जेव्हा कजोल अजय  याच्यासोबत नाही तर, एका श्रीमंत उद्योजकाला डेट करत होती. या गोष्टीचा खुलासा खुद्द काजोल हिने एका मुलाखतीत केला होता.

अजय आणि काजोल यांनी २४ फेब्रुवारी १९९९ मध्ये लग्न केलं. दोघांच्या लग्नाची गोष्ट सर्वत्र कळल्यानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. कारण कमी लोकांच्या उरस्थितीत दोघांचा विवाह सोहळा संपन्न झाला. पण अजय याच्यासोबत लग्न करण्याआधी काजोल तिच्या एका मित्राला डेट करत होती. या गोष्टीचा खुलासा खुद्द अभिनेत्रीने एका मुलाखतीत केला होता.

अजय याच्यासोबत लग्न करण्याआधी काजोल मित्र कार्तिक मेहता याला डेट करत होती. एवढंच नाही तर, लग्नाआधी अजय हिला रिलेशन टिप्स द्यायचा. पण कार्तिक याच्यासोबत अभिनेत्रीचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. अखेर कार्तिक आणि काजोल यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. सध्या सर्वत्र काजोल हिच्या खासगी आयु्ष्याची चर्चा रंगत आहे.

हे सुद्धा वाचा

काजोल कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभिनेत्री बॉलिवूडमधील अनेक गोष्टींचा खुलासा मुलाखतींच्या माध्यमातून करत असते. काजोल आता बॉलिवूडपासून दूर असली तरी कोणत्या न कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते.

काजोल हिच्या चाहत्यांची संख्या सोशल मीडियावर देखील फार मोठी आहे. सोशल मीडियावर देखील काजोल हिचे अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत असतात. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त काजोल हिची चर्चा रंगली आहे. सोश मीडियावर देखील चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.