अभिनेता सलमान खान याला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. फक्त भारतातच नाही तर, परदेशात देखील सलमान खान याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. म्हणून सलमान याच्याबद्दल कोणतीही बातमी किंवा पोस्ट समोर आल्यास चाहत्यांपर्यंत क्षणात पोहोचते. आता देखील सलमान खान याच्याबद्दल एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संबंधीत पोस्ट दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर, अभिनेता आणि सोशल मीडिया इन्फ्सन्एसर केआरके म्हणजे कमाल रशीद खान आहे. केआरके याने सोशल मीडियावर सलमान खानसाठी एक पोस्ट शेअर केली आहे.
सांगायचं झालं तर, केआरके सध्या त्याच्या एका गाण्यामुळे चर्चेत आहे. गाण्याच्या प्रसिद्धीसाठी केआरके सोशल मीडियाची मदत घेत असताना, केआरके याने सलमान खान याला धमकी दिली आहे. एवढंच नाही तर, सलमान खानने गाण्याचं प्रमोशन केल्यास भाईजानला माफ करेल… असं देखील केआरके म्हणाला आहे. सध्या केआरके याची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Mr. @BeingSalmanKhan if you will share my song on @X then I will forgive you. So it’s a good chance for you to share my song and save your film #Sikandar from becoming a flop. 👍
— KRK (@kamaalrkhan) July 18, 2024
केआरके पोस्ट करत म्हणाला, ‘सलमान खान… ट्विटरवर जर तू माझं गाणं शेअर करणार असशील तर मी तुला माफ करेल… ही तुझ्यासाठी फार चांगली संधी आहे… तू माझं गाणं शेअर कर आणि स्वतःचा ‘सिकंदर’ सिनेमा फ्लॉप होण्यापासून वाचव…’ पोस्टवर कमेंट करत भाईजानचे चाहते संताप व्यक्त करत आहेत.
सलमान खान याच्याबद्दल वाईट शब्द वापरल्यामुळे अभिनेत्याच्या चाहत्यांनी केआरकेवर निशाणा साधला आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘डील करत आहेस का?’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘भीक मागण्याची पद्धत साधी आहे…’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘सलमान खान तुला मुंबई पोलिसांच्या हाती देईल…’, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त केआरके याच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.
सलमान खान याच्या आगमी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, भाईजान ‘सिकंदर’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात सलमान खान याच्यासोबत रश्मिका मंदान्ना, सत्यराज, सुनील शेट्टी आणि प्रतीक बब्बर मुख्य भूमिकेत असणार आहेत.