The Kerala Story | कमल हसन यांच्या निशाण्यावर ‘द केरळ स्टोरी’ चित्रपट, थेट केला अत्यंत मोठा दावा, सर्व अजिबातच…

| Updated on: May 27, 2023 | 6:59 PM

द केरल स्टोरी हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. द केरल स्टोरी हा चित्रपट धमाकेदार कामगिरी करताना दिसतोय. यंदा पठाण चित्रपटानंतर सर्वाधिक कमाई करताना द केरल स्टोरी हाच चित्रपट दिसतोय. विशेष म्हणजे प्रेक्षकांमध्ये अजूनही द केरल स्टोरी चित्रपटाबद्दल मोठी क्रेझ ही बघायला मिळत आहे.

The Kerala Story | कमल हसन यांच्या निशाण्यावर द केरळ स्टोरी चित्रपट, थेट केला अत्यंत मोठा दावा, सर्व अजिबातच...
Follow us on

मुंबई : द केरळ स्टोरी हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. द केरळ स्टोरी (The Kerala Story) चित्रपटाला मोठा विरोध करण्यात आला. इतकेच काय तर अनेकांनी थेट द केरळ स्टोरी चित्रपटावर बंदी घालण्यासाठी थेट कोर्टात धाव देखील घेतली. मोठ्या वादानंतर द केरळ स्टोरी हा चित्रपट (Movie) 5 मे रोजी रिलीज झाला. चित्रपट रिलीज झाल्यानंतरही चित्रपटाचा वाद काही कमी होण्याचे नाव घेत नाहीये. विशेष म्हणजे यंदा शाहरूख खान याच्या पठाण चित्रपटानंतर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट द केरळ स्टोरी हाच ठरलाय. बाॅक्स आॅफिसवर (Box office) तूफान अशी कमाई करताना द केरळ स्टोरी हा चित्रपट दिसतोय. द केरळ स्टोरी चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळतंय.

द केरळ स्टोरी चित्रपटाने धमाकेदार सुरूवात करत अनेकांना मोठा धक्का दिला. तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये द केरळ स्टोरी चित्रपटावर बंदी घालण्यात आली. राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात चित्रपट निर्मात्यांनी थेट कोर्टात धाव घेतली. यानंतर कोर्टाने मोठा निर्णय देत पश्चिम बंगाल सरकारला झटका देत द केरळ स्टोरी चित्रपटावरील बंदी उठवली.

द केरळ स्टोरी चित्रपटाला सातत्याने अजूनही मोठा विरोध हा केला जातोय. द केरळ स्टोरी चित्रपटाबद्दल आता अभिनेते कमल हासन यांनी मोठे भाष्य केले आहे. एका मुलाखती दरम्यान बोलताना कमल हसन म्हणाले की, मी तुम्हाला सांगितले की हा चित्रपट एक प्रोपगंडा चित्रपट आहे, ज्याच्या मी विरोधात आहे. सत्य स्टोरी लिहिणे पुरेसे नाही. ते खरोखर खरे असले पाहिजे आणि ते खरे नाही.

कमल हसन हे गेल्या काही वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. कमल हसन यांचा चाहता वर्ग अत्यंत मोठा आहे. काही ठिकाणी अजूनही द केरळ स्टोरी चित्रपटाला सातत्याने विरोध हा केला जातोय. द केरळ स्टोरी चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड असा प्रतिसाद मिळतोय. विशेष म्हणजे महिला केंद्रित चित्रपटांमध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट द केरल स्टोरी हाच ठरलाय.

द केरळ स्टोरी चित्रपटाच्या सपोर्टमध्ये अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट देखील शेअर केल्या आहेत. द केरळ स्टोरी चित्रपटात अदा शर्मा ही मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटात तीन मैत्रिणी दाखवण्यात आल्या असून कशाप्रकारे त्या इस्लाम धर्म स्वीकार करतात आणि पुढे त्यांच्या आयुष्यात काय घडले हे दाखवण्यात आले आहे. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आलाय.