KRK: केआरकेला टिवटिव भोवली; वादग्रस्त ट्विटप्रकरणी मुंबई पोलिसांनी केली अटक

| Updated on: Aug 30, 2022 | 10:23 AM

2020 मध्ये केलेल्या एका वादग्रस्त ट्विटप्रकरणी (Tweet) त्याला अटक करण्यात आली आहे. मुंबई विमानतळावर पोहोचताच त्याला पोलिसांनी अटक केली. केआरकेला बोरिवली कोर्टात हजर केलं जाईल, अशी माहिती मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) दिली. 

KRK: केआरकेला टिवटिव भोवली; वादग्रस्त ट्विटप्रकरणी मुंबई पोलिसांनी केली अटक
KRK
Image Credit source: Twitter
Follow us on

स्वयंघोषित चित्रपट समिक्षक आणि अभिनेता कमाल आर. खान (Kamal Rashid Khan) याला मालाड पोलिसांनी अटक केली. 2020 मध्ये केलेल्या एका वादग्रस्त ट्विटप्रकरणी (Tweet) त्याला अटक करण्यात आली आहे. मुंबई विमानतळावर पोहोचताच त्याला पोलिसांनी अटक केली. केआरकेला बोरिवली कोर्टात हजर केलं जाईल, अशी माहिती मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) दिली. केआरके नेहमीच त्याच्या वादग्रस्त ट्विट्समुळे चर्चेत असतो. या ट्विट्समुळे तो याआधीही अनेकदा वादात सापडला होता. आता दोन वर्षांपूर्वीच्या एका वादग्रस्ट ट्विटमुळे त्याला पोलिसांनी अटक केली. धर्माबद्दल वादग्रस्त ट्विट केल्याचा आरोप केआरकेवर आहे. युवासेनेचे सदस्य राहुल कनाल यांनी त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. अटकेनंतर केआरकेला आज बोरिवली कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे.

‘माझ्या तक्रारीवरून केआरकेला आज अटक करण्यात आली. मुंबई पोलिसांच्या या कारवाईचं मी समर्थन करतो. तो सोशल मीडियावर नेहमीच अपमानास्पद कमेंट्स करतो आणि अयोग्य भाषेत तो ट्विट करतो. अशा प्रकारची वागणूक या समाजात मान्य नाही. त्याला अटक करून मुंबई पोलिसांनी चांगला संदेश दिला’, असं वक्तव्य राहुल कनाल यांनी केलं.

हे सुद्धा वाचा

आपल्या ट्विट्समुळे वादात सापडण्याची केआरकेची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्याने बॉलिवूड कलाकारांविरोधात, क्रिकेटर्सविरोधात आणि इतर मोठ्या सेलिब्रिटींविरोधात वादग्रस्त ट्विट्स केले आहेत. केआरके त्याच्या ट्विट्समध्ये शाहरुख आणि सलमानलाही बरं-वाईट बोलला आहे. केआरकेनं सलमानच्या ‘राधे’ या चित्रपटाचं अत्यंत नकारात्मक समिक्षण केलं होतं. इतकंच नव्हे तर त्यात त्याने सलमानवरही अपमानास्पद टिप्पणी केली होती. यानंतर सलमानने केआरकेविरोधात कायदेशीर कारवाई केली होती. कमाल खानने हिंदी आणि भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलंय. त्या काही चित्रपटांची निर्मितीसुद्धा केली आहे.