मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) विरोधात वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान संहिता कलम 295a आणि 153a या कलमानुसार गुन्हा दाखल आहे. या संदर्भात कंगनाला पोलीस स्टेशनमध्ये येण्यासंदर्भात पहिला समन्स 26 आणि 27 ऑक्टोबरला, दुसरा समन्स 9 आणि 10 नोव्हेंबर आणि तिसरा समन्स 23 आणि 24 नोव्हेंबर बजावण्यात आला होता. मात्र, त्यानंतर कंगनाने कोर्टात धाव घेतली होती. (Kangana has shared a video on her Twitter)
त्यावर कोर्टाने कंगनाला तपासात पोलीसांना सहकार्य करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कंगनाला आज वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये चाैकशासाठी उपस्थित राहवे लागणार आहे. मात्र, वांद्रे पोलीस स्टेशनकडे रवाना होण्यापूर्वी कंगनाने तिच्या तिच्या ट्वीटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती म्हणत आहे की, मी देशाच्या हिताच्यासाठी बोलले की माझ्यावर टीका होते. माझ्यावर अत्याचार करून माझे शोषण करण्यात आले. माझे घर तोडण्यात आले ऐवढेच नाहीतर मी ज्यावेळी ट्वीटरवर नव्हते त्यावेळी माझ्यावर केस करण्यात आली.
Why am I being mentally, emotionally and now physically tortured? I need answers from this nation…. I stood for you it’s time you stand for me …Jai Hind ? pic.twitter.com/qqpojZWfCx
— Kangana Ranaut (@KanganaTeam) January 8, 2021
माझी बहिण रंगोलीने डॉक्टरांवर होत असलेल्या अन्यायावर आवाज उठवला तर तिच्यावरही केस करण्यात आली आणि त्या प्रकरणात माझा काहीच संबंध नसताना मलाही गोवण्यात आले. मला पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावण्यासाठी सांगण्यात आले आहे. मात्र, मला माहिती नाही कोणत्या संदर्भात आणि मी काय केले आहे.
माझ्यावर झालेले अत्याचार मी कोणालाही सांगू शकत नाही. महिलांना जिवंत जाळले जाते परंतू त्या संदर्भात कोणीही आवाज उठवत नाही. हा अत्याचार लोकांच्या समोर होत आहे. राष्ट्रवादावर आवाज उठवणाऱ्यांचे आवाज जर अशा प्रकारे बंद होत असतील तर असे अत्याचार होत राहतील.
संबंधित बातम्या :
Photos | रिया चक्रवर्तीची मित्रांबरोबर पार्टी, दंगा आणि बरंच काही, सुशांतचे चाहते नाराज
(Kangana has shared a video on her Twitter)