योग्य वेळेची प्रतीक्षा.. EaseMyTrip च्या निशांत पिट्टीसोबतच्या फोटोवर अखेर कंगनाने सोडलं मौन

| Updated on: Jan 24, 2024 | 3:40 PM

अभिनेत्री कंगना रनौत तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी तिचा एक फोटो व्हायरल झाला होता. यामध्ये ती मिस्ट्री मॅनसोबत दिसली होती. कंगना त्या व्यक्तीला डेट करत असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र नंतर तिने त्यावर स्पष्टीकरण देत डेटिंगच्या चर्चा नाकारल्या होत्या.

योग्य वेळेची प्रतीक्षा.. EaseMyTrip च्या निशांत पिट्टीसोबतच्या फोटोवर अखेर कंगनाने सोडलं मौन
Kangana Ranaut and Nishant Pitti
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : 24 जानेवारी 2024 | अयोध्येतील राम मंदिरात पार पडलेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात अभिनेत्री कंगना रनौतची खास उपस्थिती पहायला मिळाली. या सोहळ्यातील विविध फोटो आणि व्हिडीओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्यातील एका फोटोने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं. ‘इझी माय ट्रिप’चे संस्थापक निशांत पिट्टीसोबतचा कंगनाचा हा फोटो होता. हा फोटो पाहिल्यानंतर कंगना निशांतला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं. या चर्चांवर अखेर बॉलिवूडच्या ‘क्वीन’ने मौन सोडलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहित कंगनाने तिच्या खासगी आयुष्याविषयी मोठा खुलासा केला आहे.

बुधवारी कंगनाने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एका वृत्ताचा स्क्रीनशॉट शेअर केला. कंगना आणि निशांत एकमेकांना डेट करत असल्याचं ते वृत्त होतं. त्यावर तिने लिहिलं, ‘मीडियाला माझी नम्र विनंती आहे की कृपया चुकीची माहिती पसरवू नका. निशांत पिट्टीजी यांचं लग्न झालेलं आहे आणि मी दुसऱ्या व्यक्तीला डेट करतेय. योग्य वेळेची प्रतीक्षा करा आणि कृपया आम्हाला लाजिरवाणं वाटेल असं काही करू नका.’ कंगनाने पहिल्यांदाच अशा पद्धतीने तिच्या रिलेशनशिपचा खुलासा केला आहे. मात्र ती कोणाला डेट करतेय, हे अद्याप तिने सांगितलं नाही. या पोस्टमध्ये तिने पुढे लिहिलंय, ‘फक्त सोबत फोटो क्लिक केल्यामुळे एका तरुण महिलेला दररोज एका नव्या पुरुषाशी जोडणं बरोबर नाही. कृपया असं करू नका.’ या पोस्टच्या अखेरीस तिने हात जोडलेले इमोजी पोस्ट केले आहेत.

हे सुद्धा वाचा

कोण आहे निशांत पिट्टी?

निशांत पिट्टी हा बिझनेसमन असून ‘इझी माय ट्रीप’चा (EaseMyTrip) सहसंस्थापक आहे. त्याने फिल्म इंडस्ट्रीमध्येही निर्माता म्हणून काम केलं आहे. त्याच्या बॅनरअंतर्गत काही बॉलिवूड चित्रपटांची निर्मिती झाली आहे. यामध्ये ‘मदारी’, ‘बत्ती गुल मीटर चालू’, ‘फन्ने खान’ आणि कंगना रनौतच्या ‘मणिकर्णिका’ या चित्रपटांचा समावेश आहे. 2020 मध्ये त्याने ‘तैश’ या चित्रपटाची निर्मिती केली होती.

अयोध्येतील मंदिरामध्ये रामचंद्राच्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आली. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी राजकारणी, चित्रपट उद्याोगातील दिग्गज, अनेक ज्येष्ठ साहित्यिक, उद्याोजक, खेळाडू यांच्यासह विविध पंथांचे शेकडो साधुसंत असे सुमारे आठ हजार निमंत्रित उपस्थित होते. राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर कंगनाने तिथल्या साधूसंतांचीही भेट घेतली.