अभिनेत्री कंगना रनौत स्टारर ‘रज्जो’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आलेली अभिनेत्री कृतिका चौधरी हिची वयाच्या 24 व्या वर्षी हत्या करण्यात आली. कृतिका हिच्या हत्येला अनेक वर्ष झाली आहेत. पण तरी देखील अभिनेत्रीच्या निधनाची चर्चा सर्वत्र सुरु असते. कृतिका हिची तिच्या घरात घुसून हत्या करण्यात आली. अभिनेत्री हत्या झाल्याचं कोणाला देखील माहिती नव्हतं. जेव्हा अभिनेत्रीच्या घरातून दुर्गंध येऊ लागला तेव्हा शेजारच्यांनी पोलिसांना कळवलं पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर कृतिका मृत अवस्थेत पडली होती.
कृतिका हिची हत्या योजना आखून करण्यात आली होती. मृत्यूनंतर तीन ते चार दिवस अभिनेत्री मृतदेह घरीच होता. आरोपींनी घरातील एसी चालू ठेवला होता. ज्यामुळे अभिनेत्रीच्या शरीराचा दुर्गंध बाहेर जायला नको. पण चार दिवसांनंतर वास शेजारच्यांना येवू लागला.
कृतिकाच्या हत्येचं गूढ उकलणं हे मुंबई पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. कारण त्या दिवशी बंद दरवाजाआड काय झालं हे कुणालाच माहीत नव्हतं. यासाठी गुन्हे शाखेची अनेक पथके तैनात करण्यात आली होती. सीसीटीव्ही तपासल्यानंतर आणि लोकांची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतलं होतं.
दोन आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांच्या हाती मोठी माहिती लागली. फक्त सहा हजार रुपयांमुळे कृतिका हिची हत्या करण्यात आली होती. पोलिसांना तपासात शस्त्र देखील जप्त केले होते. कृतिका ड्रग्सची खरेदी करायची अशी माहिती आरोपींनी पोलिसांना दिली.
ड्रग्स प्रकरणीच अभिनेत्रीची हत्या करण्यात आली. वाद झाल्यामुळे त्या रात्री आरोपी कृतिका हिच्या घरी पोहोचले. तेव्हा 6 हजार रुपयांचा विषय निघाला. अशात नोटबंदीचं कारण देत अभिनेत्रीने पैसे देणं टाळलं. याच दरम्यान एका आरोपीने स्वतःजवळ असलेल्या शस्त्राचा वापर करत अभिनेत्रीवर हल्ला केला. ज्यामुळे अभिनेत्रीचा मृत्यू झाला.
कृतिका हिला लहानपासूनच बॉलिवूडमध्ये स्वतःचं करियर करायचं होतं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कृतिका हिने आई – वडिलांकडून अभिनयाचा कोर्स करण्याची परवानगी मागितली. पण अभिनेत्रीच्या आई – वडिलांना कास्टिंग काऊचबद्दल ऐकलं होतं. पण शेवटी जे व्हायचं तेच झालं. अभिनेत्री कृतिका चौधरी हिचं वयाच्या 24 व्य वर्षी निधन झालं.