कंगना राणावत हिचा ‘हा’ चित्रपट पाहताना योगी आदित्यनाथ झाले भावूक, अखेर ते फोटो पुढे…

| Updated on: Nov 01, 2023 | 3:58 PM

बाॅलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिचा काही दिवसांपूर्वीच तेजस हा चित्रपट रिलीज झालाय. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना कंगना राणावत ही दिसली. मात्र, म्हणावा तसा धमाका करण्यात या चित्रपटाला अजिबात यश मिळाले नाही.

कंगना राणावत हिचा हा चित्रपट पाहताना योगी आदित्यनाथ झाले भावूक, अखेर ते फोटो पुढे...
Follow us on

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री कंगना राणावत ही गेल्या काही दिवसांपासून तेजस या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना कंगना राणावत ही दिसली. मात्र, तेजस या चित्रपटाला काही खास धमाका करण्यात अजिबातच यश मिळाले नाही. नुकताच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी कंगना राणावत हिचा तेजस हा चित्रपट बघितला. विशेष म्हणजे या चित्रपट पाहताना योगी आदित्यनाथ भावूक झाल्याचे बघायला मिळाले.

कंगना राणावत हिने तेजस चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगचे आयोजन केले. याचवेळीचे तिने काही फोटो शेअर केले. विशेष म्हणजे या स्पेशल स्क्रीनिंगला अनेक नेते उपस्थित दिसले. काही दिवसांपूर्वीच कंगना राणावत हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत लोकांना तेजस हा चित्रपट पाहण्यासाठी सांगितले होते. ज्याचा व्हिडीओ तूफान व्हायरल झाला.

यानंतर अनेकांनी कंगना राणावत हिची थेट खिल्लीच उडवली. आता नुकताच कंगना राणावत हिने खास फोटो शेअर करत पोस्ट शेअर केलीये. या फोटोंमध्ये योगी आदित्यनाथ हे दिसत आहेत. कंगना राणावत हिने लिहिले की, आज मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी तेजस चित्रपटाचे खास स्क्रीनिंग आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे तेजस चित्रपट सैनिक आणि शहीदांच्या जीवनावर आधारित आहे.

हा चित्रपट पाहताना योगी यांना आपले अश्रू लपवता नाही आले. सैनिकांचे धैर्य, शौर्य आणि त्यांचा त्याग पाहून योगी खूप जास्त भावूक झाले. इतकेच नाही तर यावेळी त्यांचे डोळे देखील पाणावले. धन्यवाद महाराज जी… तुम्ही केलेल्या स्तुतीने आणि आशीर्वादाने धन्य झाले. आता कंगना राणावत हिची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे.

कंगना राणावत तेजस चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसली. या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र चित्रपटाला धमाका करता आला नाहीये. कंगना राणावत ही नेहमीच चर्चेत असते. अनेकदा कंगना राणावत हिच्या निशाण्यावर बाॅलिवूड कलाकार असतात. नेहमीच आपले मत मांडताना कंगना राणावत ही सोशल मीडियावर देखील दिसते.