मुंबई | 18 जुलै 2023 : अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर कायम त्यांच्या नात्यामुळे चर्चेत असतात. गेल्या वर्षी फार कमी लोकांच्या उपस्थितीत आलिया – रणबीर यांनी लग्न केलं. लग्नाच्या दोन महिन्यांनंतर आलिया भट्ट हिने इन्स्टाग्राम सोनोग्राफीचा फोटो शेअर करत गरोदर असल्याची आनंदाची माहिती चाहत्यांना दिली. आलिया हिने ६ नोव्हेंबर रोजी राहा कपूर हिला जन्म दिला. एवढंच नाही तर, लग्न आणि आई – बाबा झाल्यानंतर रणबीर – आलिया यांना अनेक ठिकाणी स्पॉट देखील करण्यात आलं. बॉलिवूडचं क्यूट कपल म्हणून देखील आलिया – रणबीर यांची ओळख आहे. पण आता दोघांच्या नात्यामध्ये दुरावा आल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने आलिया आणि रणबीर यांचं नाव न घेता दोघांवर निशाणा साधला आहे.
आलिया आणि रणबीर यांच्यावर नाव न घेता निशणा साधणारी अभिनेत्री दुसरी – तिसरी कोणी नसून अभिनेत्री कंगना रनौत आहे. कंगना रनौत हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने बॉलिवूडचं फेक कपल म्हणून उल्लेख केला
कंगना हिने तिच्या सिनेमाच्या नकारात्मक कव्हरेजवर संताप व्यक्त करत एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये नाव न घेता कंगनाने आलिया – रणबीर यांचा उल्लेख फेक कपल म्हणून केला आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘माफिया वडिलांच्या दबावामुळे त्याने ‘पापा की परी’सोबत लग्न केलं आहे. आता दोघे एकाच इमारतीत वेगवेगळ्या मजल्यावर राहतात. दोघांचं गुपित समोर आणायला हवं…’
पुढे कंगना म्हणाली, ‘कपल नुकताच फॅमिली ट्रीपसाठी फिरायला गेला होता. पण तेव्हा तो पत्नी आणि मुलीला घेवून नाही गेला. तिचा पती मला सतत फोन करत होता. तो या ब्रेकमुळे त्रस्त आहे… असं सतत म्हणत होता… पण भारतात एकदा लग्न झालं म्हणजे झालं.. आता तरी सुधारा…’ सध्या सर्वत्र कंगना रनौत हिच्या पोस्टची चर्चा रंगत आहे.
कंगना हिने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून आलिया – रणबीर यांच्यावर निशाणा साधल्याची चर्चा रंगत आहे. पण सत्य नक्की काय अद्याप समोर आलेलं नाही. कंगना हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री कायम स्टारकिड्स आणि दिग्दर्शक करण जोहर याच्यावर निशाणा साधताना दिसते.
कायम वादग्रस्त भूमिका मांडत स्वतःचं मत व्यक्त करणारी कंगना अनेकदा वादाच्या भोवऱ्यात देखील अडकली. कायम वादाचा मुकूट आपल्या डोक्यावर मिरवणारी कंगना बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. कंगनाच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. शिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री कामय चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.