बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौत हिला हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपाने उमेदवारी जाहीर केली आहे. बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केल्यानंतर अभिनेत्रीने स्वतःचा मोर्चा राजकारणाकडे वळवला आहे. नुकताच झालेल्या एका कार्यक्रमानंतर कंगना हिने स्वतःचं मत मांडलं आहे. कंगना म्हणाली, ‘राजकीय प्रसिद्धी मिळवण्यासाठी किंवा पैसे कमावण्यासाठी नाहीतर, देशाची सेवा करण्यासाठी मी राजकारणाकडे वळली आहे. देव दयाळू आहे आणि त्याने मला आशीर्वाद दिले आहेत. जनतेची सेवा करणं हाच एक हेतू घेऊन मी राजकारणात प्रवेश केला आहे. प्रसिद्ध व्यक्ती आणि अभिनेत्री या नात्याने आपण अशा टप्प्यावर पोहोचतो जिथे प्रेक्षकही आपल्याकडून आपेक्षा करतात…
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘माझ्याकडे जे काही आहे ते सर्वकाही फक्त आणि फक्त जनतेमुळे आहे. मी खात्री करून घेईन की मी कोणतीही कसर सोडणार नाही आणि लोकांनी मला जे आशीर्वाद दिले आहेत त्यापेक्षा जास्त मी परत देईन. मी नेपोटिझम हा शब्द वापरला होता आणि मला असं म्हणायचं आहे की भाजप हा निःपक्षपाती दृष्टिकोन आणि कार्यपद्धती असलेला राजकीय पक्ष आहे.’
#WATCH | Himachal Pradesh | BJP’s candidate from Mandi for Lok Sabha elections and actor, Kangana Ranaut says, “I extend greetings to everyone on #Holi. This is my ‘janmabhoomi’ and it has called me back, I am fortunate…If they choose me, I will serve them. I am overwhelmed,… pic.twitter.com/rqdOTqi98C
— ANI (@ANI) March 25, 2024
आयुष्यात आलेल्या संकटांवर अभिनेत्री म्हणाली, ‘अडचणी अनेकदा आल्या. लहान असताना मी घर सोडून रोजगारासाठी बाहेर गेली. तेव्हा देखील मला अनेक संकटांचा सामना करावा लागला. त्यामुळे देवाने मला शक्ती आणि ऊर्जा दिली आहे. त्यामुळे आता तुमची सेवा करु शकेल…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.
‘मी पक्षात बॉलिवूड स्टार म्हणून नाहीतर, पक्षाची कार्यकर्ती म्हणून समिल झाली आहे. मी कायम पक्ष आणि समाजाच्या भल्यासाठी काम करेल.’ सध्या कंगना तिच्या राजकीय करियरमुळे चर्चेत आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कंगना हिच्या राजकारणातील प्रवेशाबद्दल चर्चा रंगली होती.
सांगायचं झालं तर, कंगना कायम राजकीय मुद्द्यांवर स्वतःचं स्पष्ट मत मांडताना दिसते. सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील अभिनेत्री अनेक नेत्यांवर निशाणा साधताना दिसते. वादाचं मुकूट कायम स्वतःच्या डोक्यावर मिरवणाऱ्या कंगनातं राजकीय करियर कसं असेल पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.