“राहुल गांधींना शिष्टाचार नाहीत,.”; कंगना यांनी ‘इमर्जन्सी’ पाहण्याचं केलं आवाहन, मिळाली अशी प्रतिक्रिया

| Updated on: Jan 10, 2025 | 1:31 PM

अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'इमर्जन्सी' हा चित्रपट येत्या 17 जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यांनी काँग्रेसचे राहुल गांधी आणि त्यांची बहीण प्रियंका गांधी यांनाही हा चित्रपट पाहण्याचं आवाहन केलं आहे.

राहुल गांधींना शिष्टाचार नाहीत,.; कंगना यांनी इमर्जन्सी पाहण्याचं केलं आवाहन, मिळाली अशी प्रतिक्रिया
Kangana Ranaut and Rahul Gandhi
Image Credit source: Instagram
Follow us on

अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि खासदार कंगना राणौत गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या आगामी ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाचं प्रमोशन करत आहेत. सेन्सॉर सर्टिफिकेटच्या अडचणी आणि शीख समुदायाकडून झालेल्या आरोपांनंतर अखेर या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कंगना यांनी संसदेत काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांच्यासोबत भेटीचा किस्सा सांगितला. यावेळी कंगना यांनी त्यांना ‘इमर्जन्सी’ चित्रपट पाहण्याचं आवाहन केलं. इतकंच नव्हे तर त्यांनी राहुल गांधींनाही या चित्रपटाविषयी सांगितलं. त्यावर दोघांची प्रतिक्रिया काय होती, याविषयी कंगना या मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाल्या. एकीकडे त्यांनी प्रियांका गांधींच्या नम्र स्वभावाचं कौतुक केलं, तर दुसरीकडे राहुल गांधींना अजिबात शिष्टाचार नाही, अशी रोखठोक प्रतिक्रिया दिली.

प्रियंका गांधींसोबतच्या भेटीबद्दल त्यांनी सांगितलं, “मी नुकतंच याबद्दल सांगितलं होतं. हा चर्चेचा इतका मोठा विषय असल्याने त्याबद्दल मी अचूकपणे सांगितलं पाहिजे. त्या (प्रियंका गांधी) संसदेतील महत्त्वाच्या व्यक्ती आणि महिला आहेत. म्हणून मला अचूकपणे सांगणं गरजेचं आहे. त्या खूपच दयाळू आहेत. मी इतकंच सांगेन की निश्चितच त्या त्यांच्या भावापेक्षा (राहुल गांधी) अधिक नम्र आहेत. संसदेत त्या चालत होत्या तेव्हा मला कोणीतरी हळू आवाजात असं म्हणताना ऐकू आलं की, ओह माय गॉड, त्यांच्या सुंदर केसांकडे पहा आणि त्यांचा पोशाख किती सुंदर आहे. मी मागे वळून पाहिलं तेव्हा मला प्रियंका गांधी दिसल्या. त्या खूपच मोहक आणि स्वागतशील होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होतं. क्षणभरासाठी मला वाटलं की संसदेतील बहुतांश लोक मी एक अभिनेत्री आहे म्हणून माझ्याशी संवाद साधत आहेत.”

प्रियंका गांधींसोबतचा संसदेतील संवाद

“मी सुद्धा त्यांच्याकडे पाहून हसले आणि धन्यवाद म्हणाले. त्या खूपच छान, प्रभावी आणि उंच आहेत. संसदेतला माझा अनुभव कसा आहे, असं त्यांनी मला विचारलं. मी त्यांना सांगितलं की हे खूपच रंजक आहे आणि मी आतापर्यंत जे काम करत आले, त्यापेक्षा खूप वेगळं आहे. याचवेळी मी संधी साधून त्यांना सांगितलं की, मी तुमच्या आजी श्रीमती इंदिरा गांधी यांच्यावर एक चित्रपट बनवला आहे. तेव्हा त्या थोड्या चकीत झाल्या. मी म्हणाले, इमर्जन्सी असं माझ्या चित्रपटाचं नाव आहे. कदाचित तुम्हाला ते पहायला आवडेल. त्या खूपच हुशार बुद्धिमत्तेच्या आहेत. त्यांनी मला सांगितलं की त्या मला इमर्जन्सीबद्दल काही तथ्य देऊ शकतात, ज्याबद्दल कदाचित मला माहिती नसेल”, असं कंगना यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

राहुल गांधींची प्रतिक्रिया

या भेटीचं वर्णन करताना कंगना पुढे म्हणाल्या, “मी त्यांना माझा चित्रपट दाखवण्याची संधी देण्याची विनंती केली आणि त्यावर त्यांचं मत काय असेल हे जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली. इमर्जन्सीबद्दल अधिक प्रामाणिक माहितीसाठी त्यांनी कॅथरीन फ्रँकच्या पुस्तकाचाही उल्लेख केला. त्यावेळी मी त्यांना स्पष्ट केलं की मी चित्रपटातील बहुतेक भाग पुपुल जयकर यांच्या आत्मचरित्रातून घेतलं आहे. जे प्रियंका गांधी यांचे वडील राजीव गांधी यांनी लाँच केलं होतं. मी त्यांना एक संधी देण्याची विनंती केली की कदाचित तुम्हाला ते आवडू शकेल. त्यावर त्या हसून ‘हम्म्म्म’ असं म्हणाल्या. संसदेतील आमचा हा संवाद खूपच सुंदर होता. माझ्यासाठी ही एक चांगली आठवण आहे. प्रियंका गांधी या त्यांच्या भावापेक्षा खूपच सभ्य आहेत. जेव्हा मी त्यांच्या भावाला माझा चित्रपट पाहण्यासाठी आमंत्रित केलं, तेव्हा ते फक्त माझ्याकडे बघून हसले आणि तिथून निघून गेले. त्यांच्याकडे फारसे शिष्टाचार नाहीत. तरीही मी त्यांना चित्रपटाचं आमंत्रण दिलं. “