Tunisha Sharma death Case : टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्माने बॉयफ्रेंड शिझानच्या मेकअपरुमध्ये गळफास लावून आत्महत्या केल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. तुनिशाच्या आईने शिझानवर गंभीर आरोप केले आहेत. तुनिशा आत्महत्या प्रकरणी अधिक चौकशीसाठी न्यायालयाने अभिनेत्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. आता याप्रकरणी अभिनेत्री कंगना रानौतने देखील प्रतिक्रिया दिली आहे. एवढंच नाही, तर अभिनेत्रीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘बहुविवाह आणि अॅसिड हल्ल्यांविरोधात महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदे तयार करण्याची विनंती केली आहे.
कंगना इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत म्हणाली, ‘एक महिला प्रेम, लग्न, नातं एवढंच नाही, तर जवळच्या व्यक्तींचं जाणं सहन करू शकते, पण ती ज्या नात्यामध्ये त्यामध्ये प्रेम कधीच नव्हते… ही गोष्ट कधीही सहन करू शकत नाही. दुसऱ्या व्यक्तीसाठी तिचं प्रेम फक्त शोषण करण्याचा सोपा मार्ग होता. त्याला फक्त तिचा शारीरीक आणि भावनिक वापर करायचा होता. अशा परिस्थितीत जर तिने स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला असेल, ते तो तिच्या एकटीचा नाही. ती हत्या आहे…’ असं अभिनेत्री म्हणाली.
पुढे कंगनााने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती देखील केली. ‘जसं कृष्णाने द्रौपदीसाठी आणि रामांनी सीतेसाठी ठाम भूमिका घेतली, तशीच भूमिका घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी बहुपत्नीत्वाविरुद्ध कठोर कायदे करतील. अशी आशा आम्हाला आहे.’
‘महिलांवर होणारे अॅसिड हल्ले आणि महिलांचे तुकडे तुकडे करून हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा करा… अशी मागणी कंगना रानौतने केली आहे. सध्या कंगनाची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.